Human Rights India: हडोळतीच्या शेतकऱ्याची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडून दखल

Viral Farmer Story: बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत खरीप हंगामातील सोयाबीन कोळपणी करणारे हडोळती (ता. अहमदपूर) येथील शेतकरी अंबादास पवार (वय ७५) यांची व्यथा दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.
Maharashtra Farmer
Maharashtra FarmerAgrowon
Published on
Updated on

Latur News: बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत खरीप हंगामातील सोयाबीन कोळपणी करणारे हडोळती (ता. अहमदपूर) येथील शेतकरी अंबादास पवार (वय ७५) यांची व्यथा दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या समाज माध्यमांवरील व्हिडिओसह वृत्तवाहिन्या व माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची तसेच या प्रकरणी दाखल तक्रारीची दखल नवी दिल्लीच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. आयोगाचे सदस्य प्रियांक कानुनगो यांनी या प्रकरणी वस्तुस्थिती व उपाययोजनांचा अहवाल दोन आठवड्यांत सादर करावा, असे आदेश मंगळवारी (ता. ८) जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार हे पत्नी मुक्ताबाई यांच्या साह्याने गेल्या दहा वर्षांपासून बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत सिंगल कोळप्याने पिकांची कोळपणी करतात. त्यांना पाच एकर जमीन असून राहायला पक्के घर आहे. त्यांचा एकुलता मुलगा पुणे येथे कंपनीत नोकरीला असून पवार दांपत्य सून व नातवंडासोबत हडोळती येथे राहतात. दहा वर्षांपूर्वी वाटणीनंतर त्यांनी बैलबारदाना मोडला.

Maharashtra Farmer
Farmer Couple Viral Story : कोळप्याला जुंपलेल्या शेतकऱ्याकडे आता दोन बैलजोड्या

दरवर्षी ते ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत करून पिकांची पेरणी करतात. यंदा त्यांची कोळपणीची कसरत समाज माध्यमांवर व्हायरल झाली. वृत्तवाहिन्या तसेच प्रसार माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या. विविध स्तरांतून त्यांना मदत मिळाली. त्यांच्या नातवांच्या शिक्षणाची हमीही अनेकांनी घेतली. दहा दिवसांत त्यांना चार लाखांहून अधिक रोख मदत मिळाली असून दोन बैलजोड्याही मिळाल्या आहेत.

Maharashtra Farmer
Farmer Struggle : मोडला बैलबारदाना, पण मोडला नाही कणा

वर्षभर पुरेल एवढा किराणाही मिळाला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या पीक कर्जाची परतफेड करून बेबाकी प्रमाणपत्रही दिले आहे. या सर्व घडामोडींवरून कोणीतरी तीन जुलै रोजी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाचे सदस्य कानुनगो यांनी त्याची दखल घेत दोन आठवड्यात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार अहवाल देण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांनी सांगितले. दरम्यान आयोगाकडे तक्रार कोणी केली, याची उत्सुकता बुधवारी (ता. ९) दिवसभर कायम होती.

सोनू सुदची रोख मदत

अभिनेता सोनू सुद यानेही या शेतकऱ्याला मदत देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीला तो ट्रॅक्टर देणार असल्याची चर्चा घडून आली. त्यानंतर त्याने बैलजोडी देण्याची तयारी दाखवली. मात्र आधीच दोन बैलजोड्यांतील चार बैलांना सांभाळण्याची जबाबदारी पवार यांच्यावर आल्याने आणखी बैलजोडी देण्याऐवजी रोख मदत द्यावी, अशी सूचना त्यांना करण्यात आली. त्यानुसार त्यांनी ४५ हजार रुपये पवार त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com