Crop Loan : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे राष्ट्रीय, खासगी बॅंकाचा काणाडोळा

Agriculture Loan : शेतकऱ्यांना खरिपात पीककर्ज वाटपाबाबत सक्त आदेश देऊनही शेतकऱ्यांना कर्ज देण्याकडे राष्ट्रीय व खासगी बॅंकाचा काणाडोळा असल्याचे खरिपात दिसून आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Nagar News : शेतकऱ्यांना खरिपात पीककर्ज वाटपाबाबत सक्त आदेश देऊनही शेतकऱ्यांना कर्ज देण्याकडे राष्ट्रीय व खासगी बॅंकाचा काणाडोळा असल्याचे खरिपात दिसून आले आहे. नगर जिल्ह्यात चोवीस पैकी आठ बॅंकानी अल्प कर्जवाटप केले आहे.

यंदा केवळ महाराष्ट्र ग्रामीण, आरबीएल बॅंकेने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंकेनेही यंदा उद्दिष्टापेक्षा तेरा टक्के कर्जवाटप कमी केल्याचे दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जवाटपाबाबत शासनाकडूनच सक्त आदेश आले होते. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यात राष्ट्रीय व खासगी बॅंकानी फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले नाही. खरिपात ४ लाख ४४ हजार ५७२ शेतकऱ्यांना ५ हजार ४५७ कोटी ८ लाखाचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट दिले होते.

Crop Loan
Crop Loan : राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांचा पीककर्ज वाटपात हात आखडता

साधारण सप्टेंबरपर्यंत हे कर्जवाटप करणे अपेक्षित असते. राष्ट्रीय व खासगी बॅंका सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी येऊनही त्याचा फारसा फायदा झाल्याचे दिसत नाही. यंदा खरिपासाठी राष्ट्रीय १२ बॅंकांनी २३७२ कोटी रुपयांपैकी ७७३ कोटी ४० लाखांचेच वाटप केले आहे.

त्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, इको बॅंक यांनी अल्प कर्जवाटप केले. खासगी १२ बॅंकांनी ६४४ कोटी ३४ लाख रुपये वाटप करणे अपेक्षित होते. या बॅंकांनी २२५ कोटी ६५ लाख रुपये म्हणजे ३५.०२ टक्के कर्जवाटप केले आहे. कोटक महिंद्रा, इंडस, आयसीआयसीआय, सीएसबी या बॅंकानी अल्प कर्जवाटप केले आहे. डीसीबी बॅंकेने तर एक रुपयाही कर्जवाटप केले नाही.

Crop Loan
Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

जिल्हा बॅंकेला यंदा १ लाख १९ हजार ७५२ शेतकऱ्यांना २ हजार ४०५ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. जिल्हा बॅंकेने खरिपात २ हजार ७३ कोटी ३७ लाख रुपये म्हणजे ८६.१८ टक्के कर्ज दिले. यंदा महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ३४ कोटी ६ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट होते. या बॅंकेने ३५ कोटी १२ लाख रुपये वाटप केले. ज्या बॅंकानी कर्जवाटपाकडे दुर्लक्ष केले त्यांना सूचना दिल्या असून रब्बीत असे झाले तर कारवाई होईल, असे अग्रणी ब्रॅंकेचे व्यवस्थापक आशिष नवले यांनी सांगितले.

बॅंकनिहाय कर्जवाटप (टक्के)

बॅंक ऑफ बडोदा ः २९.३०, बॅंक ऑफ इंडिया ः ७९.९९, बॅंक ऑफ महाराष्ट्र ः ३४.८६, कॅनरा बॅंक ः ११.८२, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया ः ३५.५२, इंडिया बॅंक ः ३८.९७, इंडियन ओव्हरसिस बॅंक ः २४.८३, पंजाब आणि सिंध बॅंक ः ९२.७२, स्टेट बॅंक ऑफ इंडिया ः १९.६९, युको बॅंक ः १५.३७, युनियन बॅंक ऑफ इंडिया ः ४६.४३, अॅक्सिस बॅंक ः ३१.४१, सीएसबी बॅंक ः ७.५२, डीसीबी बॅंक ः ०, फेडरल बॅंक ः ४९.१५, एचडीएफसी बॅंक ः ५४.६७, आयसीआयसी बॅंक ः १६.८६, आयडीबीआय बॅंक ः ३४.३५, आयडीएफसी बॅंक ः ४५.०२, इंडस बॅंक ः ३.४२, कोटक महिंद्रा बॅंक ः ३.५४, आरबीएल बॅंक ः १०४.६४, येस बॅंक ः ५६.४२, जिल्हा सहकारी बॅंक ः ८६.१८, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ः १०३.१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com