Agriculture Irrigation : पाण्यासाठी ‘कडा’ कार्यालयावर धडक मोर्चा

Protest For Water : नांदूर मधमेश्‍वर जलद कालव्यास उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी पहिले आवर्तन न सोडल्याने शुक्रवारी (ता. ११) कडा कार्यालयावर लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.
Protest For Water
Protest For Water Agrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajainagar News : नांदूर मधमेश्‍वर जलद कालव्यास उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी पहिले आवर्तन न सोडल्याने शुक्रवारी (ता. ११) कडा कार्यालयावर लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. आधार शेतकरी जलदूत समितीच्यावतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला.

यासंदर्भात मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक (लाक्षवि) कडा येथे निवेदन देण्यात आले होते. नांदूर मध्यमेश्‍वर कालव्याच्या वैजापूर, गंगापूर व कोपरगाव लाभक्षेत्रातील लाभधारक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा, मक्का बाजरी, भाजीपाला तसेच जनावरांसाठी हिरवा चारा व फळबाग या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

मोठ्या प्रमाणात तापमान वाढत असल्यामुळे जमिनीतील पाणीपातळी खोल गेली आहे. त्यामुळे लागवड केलेली पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. तसेच पिकाच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना संकटाला सामोरे जावे लागत आहे.

Protest For Water
Agriculture Irrigation : ‘त्या’ १४ गावांना मिळणार खडकपूर्णाचे पाणी

त्यामुळे त्वरित पाणी नाही सोडल्यास लाभक्षेत्र शेतातील उभी पिके जळून शेतकऱ्याचे करोडो रुपयाचे नुकसान होणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते. निवेदन दिल्यानंतरही पाणी न सोडल्याने तकडा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेतकरी जलदूत समितीचे अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे, कृष्णा पाटील, सोन्याबापू शिरसाट, मंदाबाई न्हावले, अनिताताई चोभे, तन्मय कांबळे आदी सहभागी झाले होते.

Protest For Water
Agriculture Irrigation : सिंचनासाठी सहा धरणांतून ४,७४२ क्युसेक विसर्ग

सिंचनाचे नियोजन नाही

नांदूर मध्यमेश्‍वर प्रकल्पात उपलब्ध पाण्यावर सिंचनाच्या नियोजनाकरिता जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. नांदूर मध्यमेश्‍वर कालव्याद्वारे कालवा मुखाशी ४०३४ दशलक्ष घनफूट देण्यासंबंधी नियोजन झाले.

त्यापैकी ३१३४ दशलक्ष घनफूट पाण्याचा रब्बी हंगामातच वापर झाला. उर्वरित ९१० दशलक्ष घनफूट उन्हाळी हंगामात एक पाण्याचे आवर्तन बिगर सिंचन पाणी वापरासाठी नियोजन गोदावरी डाव्या कारणे सोबत करण्यात आले आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध न झाल्याने पुढील आवर्तनात सिंचनाचे नियोजन नसल्याचे कडा कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांनी मोर्चेकऱ्यांना लेखी दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com