Agriculture Irrigation : सिंचनासाठी सहा धरणांतून ४,७४२ क्युसेक विसर्ग

Water Storage : पावसाचे प्रमाण सरासरी इतके राहूनही या वर्षी जिल्ह्यात टंचाईच्या झळा फारशा जाणवत नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रमुख धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे चित्र आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Satara News : पावसाचे प्रमाण सरासरी इतके राहूनही या वर्षी जिल्ह्यात टंचाईच्या झळा फारशा जाणवत नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रमुख धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विविध भागांतील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. सहा धरणांतून सध्या तब्बल ४,७४२ क्युसेक पाणी कालव्यातून सोडले जात आहे.

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणी विविध योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला सोडण्यात आले आहे. काही योजनांची कामे सुरू आहेत. तरीही माण तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यासाठी धरणातून सिंचनासोबतच पिण्यासाठीही पाणी सोडले जात आहे. या वर्षी धरणांत पुरेसा पाणीसाठा आहे.

Water Storage
Agriculture Irrigation : चणकापूर, पुनंद धरणांतून आवर्तन सोडले

त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. सध्या धरणांमध्‍ये सरासरीच्या प्रमाणात ३४ ते ५६ टक्‍के पाणी आहे. हे पाणी आगामी दीड-दोन महिने वापरायचे आहे. मॉन्सून लांबल्यास पिण्यासाठी धरणातील काही पाणीसाठा राखीव ठेवावा लागणार आहे. सध्यातरी सिंचनासाठी बहुतांशी धरणातून पाणी सोडले जात आहे.

Water Storage
Agriculture Irrigation : ‘त्या’ १४ गावांना मिळणार खडकपूर्णाचे पाणी

त्यामुळे उन्हाळी पिकांच्‍या उत्पादनात वाढ होणार आहे. वेळेत पाणी मिळाल्याने शेतकरीही सुखावला आहे. सध्या कोयनेतून सिंचनासाठी ३१०० क्युसेक, धोममधून ७६०, धोम बलकवडी ३३४, कण्हेर ४५०, उरमोडी ५९५, तारळी २६३ क्युसेक असे एकूण ४७४२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे खूपच जास्त आहे.

धरण पाणीसाठा टीएमसीत, कंसात टक्केवारी : कोयना : ५१.५७ (४९.००), धोम ६.२७ (४६.४२), कण्हेर ५.५४ (५४.८७), धोम बलकवडी १.१७ (३१.४९), तारळी २.७० (४६.०८), उरमोडी ५.६३ (५६.५९), येरळवाडी ०.७० (३४.२३).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com