Tree Name To Home : मान्याच्यावाडीतील घरांना झाडांची नावे

Rural Development : उपक्रमशील गाव म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याच्यावाडीत अनोखा नामकरण सोहळा पार पडला.
ManyachiWadi Satara
ManyachiWadi Satara Agrowon
Published on
Updated on

Satara News : उपक्रमशील गाव म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याच्यावाडीत अनोखा नामकरण सोहळा पार पडला. हे नामकरण कोणत्या छोट्या बाळाचे नव्हे तर चक्क तेथील घरांचे होते. या विशेष कार्यक्रमात प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळ्या प्रकारची झाडे देऊन त्या झाडांचे नाव घरांनांही देण्यात आली.

त्यामुळे यापुढे मान्याचीवाडीतील घरे आंबा घर, चिक्कू घर, नारळ घर, दालचिनी घर, पेरू घर आदी नावांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतील. निसर्ग आणि वृक्षांबाबतचे प्रेम उपक्रमाने आधिकच दृढ झाले.

ManyachiWadi Satara
Tree Plantation : वृक्षारोपणासाठी ‘मनरेगा’सह ‘टॉप अप मॉडेल’ राबविणार

नवनवीन संकल्पना आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी राज्यासह परराज्यातून गावात येणाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांना देशी प्रजातींच्या वृक्षांची ओळख होऊन त्यांच्यात झाडांविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येक कुटुंबाला एकाच प्रकारची दोन झाडे व त्याच्या जपणुकीची जबाबदारी देण्याची आणि त्याच झाडाच्या नावाने त्या घराचेही नामकरण करण्याची संकल्पना पुढे आली. ग्रामसभेत त्यावर शिक्कामोर्तबही झाले.

ManyachiWadi Satara
State Trees : राज्य झाडं म्हणून आंब्याला का मिळाला मान?

प्रत्येक कुटुंबाने झाडांसाठी घरातील तेलाचे रिकामे डबे शेतातील माती भरून ग्रामपंचायतीकडे दिले. त्यात आंबा, चिकू, दालचिनी, काजू, पेरू, जांभूळ अशा ३० वर जातींच्या वृक्षांची लागण करून ग्रामपंचायतीने ही रोपे घरोघरी वितरित केली. त्याच झाडांच्या नावाने चिमुकल्या कन्यांच्या हस्ते घरांचे नामकरणही करण्यात आले. या वृक्षांचे फायदे, उपयोग, शास्त्रीय माहिती आदींचा उल्लेख असलेले पोस्टर्सही तेथे लावण्यात आले.

मान्याचीवाडीत १२८ कुटुंबे व २१२ घरे आहेत. खातेदारांच्या मिळकतीच्या उताऱ्यावरही घरांच्या नामकरणाचा उल्लेख करण्याचे नियोजन आहे. सरपंच रवींद्र माने, सदस्य उत्तमराव माने, दिलीप गुंजाळकर, लता आसळकर, निर्मला पाचुपते, सीमा माने, मनिषा माने, माजी सरपंच संगीता पाचुपते, ग्रामसेवक प्रसाद यादव, सर्जेराव माने, विठ्ठल माने, तंटामुक्तीचे अध्यक्ष दादासाहेब माने, पोलिस पाटील विकास माने आदी उपस्थित होते.

प्रत्येक कुटुंबाने सुरवातीला झाड डब्यात जतन करून नंतर ते गावठाण परिसर किंवा परड्यात लावायचे आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये या झाडांचा वाढदिवस साजरा करणार आहोत.
- रवींद्र माने, सरपंच, मान्याचीवाडी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com