Swapnil Shinde
भारताला "राज्यांचे संघराज्य" म्हटले जाते. प्रत्येक राज्याचे स्वतःचे वेगळे हवामान, कला संस्कृती आणि जीवनशैली असते.
ज्याप्रमाणे भारतामध्ये राष्ट्रीय चिन्ह आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे स्वतःचे राज्य वृक्ष आणि फुले आहेत
त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख मिळते. याशिवाय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे स्वतःचे राज्य प्राणी आणि पक्षी आहेत.
महाराष्ट्र राज्याचं झाडं म्हणून आंबाला मान दिला जातो. आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारं झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला ‘कोकणचा राजा’ असं म्हणतात. भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नाडिस, रायवळ इ. जाती आहेत.
पिंपळाचे झाड हे बिहार राज्याचे झाड आहे. हिंदू धर्मामध्ये पिंपळाला अनन्य साधारण महत्व आहे.
कडुनिंब हे आंध्रप्रदेशचे राज्य झाड आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसामचे होलोंग हे राज्य वृक्ष आहे.
कर्नाटकचे चंदन, केरळचे नारळ, मध्य प्रदेशातील वड हे राज्याचे वृक्ष आहेत.
नागालँड हे एल्डर, ओडिशाचे बरगद, पंजाबचे शीशम, राजस्थानचे खेजरी आणि यूपीचे अशोकाचे झाड राज्य वृक्ष म्हणून ओळखले जाते.