India Politics : नायडूंना हवीत सहा मंत्रालये

Loksabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांचे राजकीय वजन वाढले आहे.
Narendra Modi, Chandrababu Naydu and Nitish Kumar
Narendra Modi, Chandrababu Naydu and Nitish KumarAgrowon

Delhi News : लोकसभा निवडणुकीनंतर तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांचे राजकीय वजन वाढले आहे. आता दोन्ही पक्षांकडून केंद्रात प्रमुख मंत्रालयाची मागणी केली जात असताना टीडीपी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एनडीएकडे सहा मोठ्या मंत्रालयाची मागणी केल्याचे म्हटले आहे. तेलुगू देसमला लोकसभेचे अध्यक्षपदही हवे आहे.

दिल्लीत बुधवारी (ता. ५) झालेल्या एनडीएच्या बैठकीत तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू सामील झाले होते. पक्षाच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मोदी ३.० सरकारमध्ये टीडीपी महत्त्वाची भूमिका बजावू इच्छित असून आपल्या मागण्यांची यादी भाजप नेत्यांना सादर केली आहे.

Narendra Modi, Chandrababu Naydu and Nitish Kumar
Indian Politics : मोदींची काथ्याकूटनीती

यात लोकसभेचे अध्यक्षपद आणि किमान पाच मंत्रालयांचा समावेश आहे. यात अर्थमंत्रालय, जलशक्ती मंत्रालय यांसारख्या मंत्रालयांचा समावेश असल्याचे समजते. दुसरीकडे नितीशकुमार यांनी तीन मंत्रालये देण्याची मागणी केली आहे.

Narendra Modi, Chandrababu Naydu and Nitish Kumar
Maharashtra Lok Sabha Election : ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांनी भाजपला चारली धूळ, ८ पैकी ५ जागांवर आघाडीला पसंती

तसेच बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. जेडीयूने चार खासदारांमागे एक मंत्रालय असा फॉर्म्यूला सरकारसमोर ठेवला आहे. जेडीयूचे बारा खासदार आहेत आणि म्हणूनच तीन मंत्रालय हवे आहेत. रेल्वे, कृषी आणि अर्थमंत्रालय देण्याबाबत जेडीयू आग्रही आहे. प्रामुख्याने रेल्वे मंत्रालयासाठी अधिक भर दिला जात आहे.

नायडूंचा बारा जूनला शपथविधी शक्य

तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून १२ जून रोजी शपथ घेऊ शकतात. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, नायडू हे ९ जून रोजी शपथ घेणार होते. मात्र मोदी यांच्या शपथविधीची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नसल्याने १२ जूनपर्यंत शपथविधी पुढे ढकलला आहे.

आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला १३५ जागा मिळाल्या आहेत. राज्यात १७५ जागा असून बहुमतासाठी ८८ जागा आवश्‍यक आहेत. मात्र टीडीपीने दमदार कामगिरी करत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. तसेच लोकसभेत १६ जागा जिंकल्या आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी अमरावती येथे होऊ शकतो. नायडू हे आंध्राचे चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com