seafood : 'भारतात सीफूड युनिट्ससाठी मजबूत फ्रेमवर्क' : वाणिज्य मंत्रालय

Commerce Ministry : भारतात सीफूडच्याबाबतीत मजबूत फ्रेमवर्क असून येथे ५४८ प्रकारच्या सीफूडसाठी जागतिक दर्जाची युनिट्स स्थापन करण्यात आल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.
seafood
seafood Agrowon

Pune News : देशाच्या वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी (ता. २४) देशातील सीफूडच्या संदर्भात एक निवेदन जाहीर केले आहे. या निवेदनात मंत्रालयाने, भारतात सीफूडच्या बाबतीत मजबूत फ्रेमवर्क असून येथे ५४८ सीफूड युनिट्ससाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उभारल्या आहेत. तर या सीफूड युनिट्सची तपासणी आणि देखरेख देशातील विविध सरकारी संस्थांद्वारे नियमितपणे केली जाते, असे म्हटले आहे. तर हे निवेदन मंत्रालयाने झिंगा (कोळंबी) उद्योगातील अन्न सुरक्षेवरून आरोप करणाऱ्या काही अहवालांच्या पार्श्वभूमीवर दिले आहे. तसेच, देशातील सर्व ४६ युनिट्स हे सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) मध्ये नोंदणीकृत असून यांना निर्यात तपासणी परिषदेने (EIC) मान्यता दिल्याचेही मंत्रालयाने सांगितले आहे.

तसेच मत्स्यपालन फार्म कोस्टल एक्वाकल्चर अथॉरिटी (CAA) आणि राज्य मत्स्यव्यवसाय विभागांमध्ये यांची ही केंद्रे नोंदणीकृत आहेत. जी यूएस सीफूड इम्पोर्ट मॉनिटरिंग प्रोग्राम (SIMP) सह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियामक तरतुदींचे पालन करते, असेही मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच कामगार विभाग नियमितपणे या युनिट्समधील कामगार आणि मत्स्यपालन आणि मत्स्यप्रक्रियेत गुंतलेल्या संघटित आणि असंघटित क्षेत्रावर लक्ष ठेवण्याचे काम करते असे मंत्रालयाने सांगितले आहे.

seafood
Seafood Exports : भारताची मत्स्य निर्यात पोहोचली ८०० कोटी डॉलरवर

“भारतातील नियामक संस्थांद्वारे उत्पादन आणि प्रक्रिया प्रणालीचे नियमितपणे निरीक्षण करण्याबरोबरच यूएस एफडीए (अन्न आणि औषध प्रशासन), युरोपियन कमिशन, चीनचे गॅक (GAC), निर्यात तपासणी संस्था, सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (Marine Products Export Development Authority) यांच्या निरीक्षकांद्वारे या युनिट्सचे ऑडिट केले जाते असेही या निवेदात म्हटले आहे. तर उत्पादनांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी, २००२ पासून मत्स्यपालनामध्ये औषधी पदार्थांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती देखील वाणिज्य मंत्रालयाने या निवेदनातून दिली आहे.

seafood
का पडतेय भारतीय Seafood Exportला मर्यादा?| Indian Seafood Export | Agrowon

तसेच बिझनेस स्टँडर्डमधील आलेल्या वृत्तात, "भारत या आरोपांचे खंडन करत असून भारताने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६३,९६९.१४ कोटी (US$ 8.09 अब्ज) किमतीचे १७,३५,२८६ टन सीफूड विक्रमी निर्यात केल्याची माहिती मंत्रालयाने म्हटले आहे

तर आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ४.३१ टक्के इतकी झिंगा उत्पादनात झाले असून अमेरिका आणि चीन भारताचे सीफूडचे प्रमुख आयातदार आहेत. यातून भारताने ४३,१३५.५८ कोटी रुपये (US$5,481.63 दशलक्ष) कामावले असून यात झिंग्याचा वाटा ४०.९८ टक्के आहे. जो एकूण यूएस डॉलरच्या कमाईत ६७.७२ टक्के आहे. तर २०२२-२३ वर्षात झिंग्याची एकूण निर्यात ७,११, ०९९ टन झाली होती. यात अमेरिका २,७५,६६२ टन आणि चीनने १,४५,७४३ टन आयात केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com