Nagpur Seed Hub: नागपुरात जवस सीड हबला केंद्राची मान्यता: जवस शेतीला मोठा आधार

ICAR approval: भारतीय कृषी संशोधन परिषदेने नागपूरच्या जवस संशोधन केंद्राला देशातील सात सीड हबपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे तेलबिया उत्पादनाला चालना मिळणार असून, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल.
Linseed
LeenseedAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: देशात तेलबियावर्गीय पिकाच्या लागवड व बीजोत्पादनाला प्रोत्साहन भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत देशात ७ सीड हबला मान्यता देण्यात आली आहे. त्यातील जवस पिकाचे सीड हब डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत नागपूर येथील जवस संशोधन केंद्राला मंजूर झाले आहे.

भारतीय तेलबिया संशोधन संस्था (हैदराबाद) यांच्या माध्यमातून नागपुरातील जवस संशोधन केंद्राचे संनियंत्रण होते. पूर्व विदर्भातील धानपट्ट्यात उत्पन्नक्षम पिकांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नातून ‘पंदेकृवी’अंतर्गत असलेल्या या केंद्राने जवस, मोहरी लागवडीसाठी पीक प्रात्यक्षिकांवर भर दिला आहे. गेल्या हंगामात जवसाचे ५५०, तर मोहरीचे ४०० प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम या भागात राबविण्यात आला.

Linseed
Leenseed Farming: पूर्व विदर्भात जवसाचे पुनरुज्जीवन

भंडारा जिल्ह्यात मोहरीला प्रोत्साहन दिले जात असून, तर चंद्रपूरमध्ये जवस पिकाला प्रोत्साहन दिले जात आहे. प्राथमिक अभ्यासात जवस हे चंद्रपूरचे पारंपरिक पीक असल्याचे लक्षात आले. जवस तेल खाण्यावरही या भागातील नागरिकांचा भर होता. त्यामुळे या भागात जवस शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. २५० ते ४०० रुपये किलोचा दर जवस तेलाला मिळत असल्याची माहिती जवस संशोधन केंद्राच्या डॉ. बिना नायर यांनी दिली.

Linseed
Leenseed Cultivation : आरोग्यदायी जवस पिकाची लागवड

सीड हबला मान्यता

कृषी मंत्रालयाच्या तेलबिया विभागाकडून देशात सोयाबीन, करडई, कारळ याप्रमाणे सात सीडहबला १७ जानेवारी २०२५ रोजी मान्यता देण्यात आली. यातील जवस करिताचे सीड हब नागपूरला मंजूर झाले आहे. याकरिता एक कोटी रुपयांची तरतूद आहे. गोदाम, सिंचन यांसह इतर संसाधनाकरीता ५० लाख रुपये, तर उर्वरित ५० लाख रुपये हा फिरता निधी राहील. सध्या मंजूर निधीपैकी १५ टक्‍के प्राप्त झाला आहे. प्रकल्पातून २५ क्‍विंटल ब्रिडर सीड दर वर्षी तयार होईल. महाबीज किंवा राष्ट्रीय बियाणे महामंडळाला याचा पुरवठा होतो. राष्ट्रीय खाद्यतेल मिशनअंतर्गत हा प्रकल्प आहे.

कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, सह्योगी अधिष्ठाता डॉ. विलास अतकरे यांच्या मार्गदर्शनात कामाच्या माध्यमातून नागपुरातील जवस संशोधन केंद्राने देशभरात आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून देशातील सातपैकी एक सीड हब नागपुरात मंजूर झाले आहे
डॉ. बीना नायर, जवस पैदासकार, जवस संशोधन केंद्र, नागपूर
कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्व विदर्भात धानाला पर्याय म्हणून रब्बी हंगामात तेलबियावर्गीय पिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकऱ्यांकडून देखील या पिकांचा अवलंब होत असल्याने येत्या काळात धानपट्ट्यातील चित्र बदलले राहील असा विश्‍वास आहे.
डॉ. विलास अतकरे, सहयोगी अधिष्ठाता, नागपूर कृषी महाविद्यालय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com