Leenseed Cultivation : आरोग्यदायी जवस पिकाची लागवड

Leenseed Farming : जवस हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे. ते तेलासोबतच औषध निर्मिती आणि औद्योगिक उपयोगी आहे. जवस हे अतिशय पौष्टिक आहे.
Leenseed
Leenseed Agrowon
Published on
Updated on

स्मिता प्रचंड, डॉ. विशाल गमे

Rabi Season : जवस हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलवर्गीय पीक आहे. ते तेलासोबतच औषध निर्मिती आणि औद्योगिक उपयोगी आहे. जवस हे अतिशय पौष्टिक आहे. जवस तेलात ५८ टक्के ओमेगा-३ मेदाम्ले व अँटी ऑक्सिडंट्स आहे. ती उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, ट्रायग्लीसराईडचे रक्तातील उच्च प्रमाण यांना नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

त्याच प्रमाणे संधिवात आणि त्वचारोगावरही जवस तेल उपयुक्त आहे. मधुमेही रुग्णांसाठी जवस उत्तम पर्याय आहे. जवसाच्या उपयोग वैद्यकीय सल्ल्यानुसार केल्यास पित्त, पाठदुखी, जखम, दाह कमी होऊ शकतो.

हवामान व जमीन

जवस हे थंड हवामान्यातील पीक असल्यामुळे रब्बी हंगामात लागवड केली जाते. त्यासाठी मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन, पण चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

पूर्वमशागत

सुरुवातीला जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. त्यानंतर एक ते दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेतातील काडीकचरा वेचून घेऊन शेवटच्या वखरणीपूर्वी चांगले

कुजलेले शेणखत शेतजमिनीत मिसळून घ्यावे.

Leenseed
Leenseed Food Processing : जवसाचे प्रक्रियायुक्त पदार्थ

बीजप्रक्रिया

मर व करपा रोगास जवसाचे पीक संवेदनशील असते. त्यामुळे थायरम ३ ग्रॅम व कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे प्रक्रिया पेरणीपूर्वी करावी.

पेरणीची वेळ

जवस पिकाची पेरणी ओलिताची सोय असल्यास १० नोव्हेंबरपर्यंत करता येते.

बियाणे मात्रा व लागवड अंतर

जवस पिकाच्या लागवडी करता प्रति हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे वापरावे. तसेच दोन ओळींमधील अंतर ३० सेंटिमीटर व दोन रोपांमधील अंतर १० सेंटिमीटर ठेवावे.

खत व्यवस्थापन

कोरडवाहू पिकासाठी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. बागायती पिकासाठी ३० किलो नत्र, ३० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. उर्वरित ३० किलो नत्र पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी द्यावे.

Leenseed
Leenseed Cultivation : पूर्व विदर्भात जवस लागवडीला प्रोत्साहन

पाणी व्यवस्थापन

जवस हे पीक पाण्यास उत्तम प्रतिसाद देणारे आहे. या पिकास किमान दोनदा पाणी देणे आवश्यक आहे. पहिले पाणी पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच ४० ते ४५ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६५ ते ७० दिवसांनी द्यावे.

आंतरमशागत

पीक पहिल्या ३०-४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवावे. पेरणीनंतर २५ दिवसांनी पहिली निंदणी किंवा खुरपणी करावी.

सुधारित वाणांची निवड

कोरडवाहू परिस्थितीत लागवड करण्यासाठी किरण, शीतल, श्‍वेता, पुसा-३ या शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. बागायती पिकासाठी जवाहर-२३, जवाहर-७, एनएल-११२, एनएल-९७, एनएल-१६५, पीके एनएल-२६० या वाणांची शिफारस केलेली आहे. वाणाची निवड करताना आपल्या परिसरासाठी शिफारशीत व चांगले उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी.

- स्मिता प्रचंड, ९९२१८७०५२१

(कृषी विद्या विभाग, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मयोगी दु. सि. पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com