NAFED Onion Procurement: अवसायनातील संस्थेकडून ‘नाफेड’ची कांदा खरेदी

Cooperative Fraud: केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्या गैरव्यवहार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर सुधारणा करण्यासाठी ‘नाफेड’ने सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय घेतला.
Onion Procurement
Onion ProcurementAgrowon
Published on
Updated on

Nashik News: केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदीत शेतकरी उत्पादक कंपन्या गैरव्यवहार करत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर सुधारणा करण्यासाठी ‘नाफेड’ने सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय घेतला. यामध्ये अवसायनात निघालेल्या बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्थेकडून सर्रास कांदा खरेदी सुरू असल्याने खळबळ उडाली आहे. पारदर्शकतेच्या गप्पा मारणारे नाफेड प्रशासन या प्रकारामुळे तोंडावर पडले असून आता खरेदी थांबविण्याचे आदेश देण्याची वेळ आली आहे.

‘नाफेड’च्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात १२ सहकारी संस्थांना खरेदीचे काम देण्यात आले होते. या यादीत २०१८ मध्ये स्थापन झालेल्या ‘बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्थे’चा समावेश होता. ही संस्था नाशिक जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत असून, संस्थेच्या मंजूर उपविधीमधील तरतुदीनुसार कामकाज करणे बंधनकारक होते. मात्र त्यानुसार कामकाज केले नसल्याने ३१ डिसेंबर २०२४ रोजी ही संस्था अवसायनात काढण्यासंबंधी अंतरिम आदेश निघाला. तर २८ मार्च २०२५ रोजी अंतिम आदेश झाला. त्यानुसार पुढे संस्थेवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सहकार अधिकारी वैशाली आव्हाड यांची नियुक्ती केलेली होती.

Onion Procurement
NAFED Onion Scam : नाफेडच्या कांदा खरेदीतील घोटाळेबाजांवर कारवाई करा

असे असताना संस्थेच्या संचालकांनी कांदा खरेदीची निविदा भरली आणि खरेदी देखील मिळवली. मात्र नाफेडने या संस्थेची शहानिशा न करता खरेदी सदर कंपनीला दिली. यावरून संस्थेने असे कोणते दस्तावेज दिले, की आर्थिक देवाण-घेवाणीचे काम झाले, असा प्रश्‍न यामुळे उपस्थित होत आहे. ही संस्था दिंडोरी तालुक्यात असून, खरेदीसाठीचे गोडाऊन पिंपळगाव बसवंत येथे दाखवण्यात आले होते. ही संस्था अवसायनात असताना खरेदी करत असल्याची गंभीर बाब जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी समोर आणून नाफेडला कळवली आहे.

Onion Procurement
NAFED Onion Procurement: नाफेडचा कांदा खरेदीत ‘एमएसपी’ दाव्याचा संतापजनक प्रकार

कांदा खरेदी केंद्रावरील खरेदी व आनुषंगिक कामकाज तत्काळ थांबविण्याबाबत मुलाणी यांनी नोटीस बजावली आहे. त्यात भविष्यात कायदेशीर बाबी उद्भवल्यास संबंधित जबाबदारी तुमची असेल असे लेखी कळविल्याने नाफेडला जाग आली. संबंधित संस्थेला खरेदीबंदचे आदेश देण्यात आले असल्याचे समजते. मात्र यावर नेमकी कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे.

संस्था अवसायनात जाण्याची कारणे

संस्थेने विहित कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविलेली नाही.

वार्षिक आर्थिक ताळेबंद देखील सादर करण्यात आलेला नाही.

खरेदी केंद्र नियुक्ती करणारी समितीवर संशय

नाफेडच्या कांदा खरेदीसाठी ७५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी अंतिम २४ जणांना खरेदी देण्यात आल्याचे समजते. मात्र नाफेडने निविदा मागवल्यानंतर बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्थेने मूळ कागदपत्रे सादर केली होती का, खरेदी केंद्र नियुक्तीसाठी दिल्लीतून आलेल्या समितीने पारदर्शकपणे दस्तावेज तपासले का, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com