Onion Procurement : बाजार समित्यांत ‘नाफेड,’‘एनसीसीएफ’मार्फत कांदा खरेदी करा

Onion Market : मागील वर्षी जिल्ह्यात ३६ लाख टन कांद्याचे उत्पादन घेतले होते.यंदा ५९ लाख टनापर्यंत उत्पादन वाढलेले आहे. उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात ६३ टक्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्याकरिता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये केंद्र शासनाच्या ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ मार्फत कांदा खरेदी तत्काळ सुरू करावी, अशी मागणी कळवणचे आमदार नितीन पवार यांनी केली असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उ पमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे,कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन दिले आहे.

राज्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.त्यात नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा असून राज्याच्या एकूण उत्पाद‌नापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते.त्यास देशांतर्गत व देशाबाहेर देखील मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

मागील वर्षी जिल्ह्यात ३६ लाख टन कांद्याचे उत्पादन घेतले होते.यंदा ५९ लाख टनापर्यंत उत्पादन वाढलेले आहे. उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात ६३ टक्यांनी वाढ झाल्याची माहिती आहे.आजमितीस जिल्ह्यातील विविध कृषी उत्पत बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल सरासरी १,५०० रुपये दर मिळत आहे.

Onion Market
Onion Market : जूनमध्ये कांदा आवक घटण्याची शक्यता

जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये प्रति दिन सुमारे २ लाख क्विटंल कांद्याची आवक होत आहे.आजमितीस शेतकऱ्यांना मिळत असलेला सरासरी दर हा उत्पादन खचनिशा खूप कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी असंतोष निर्माण झालेला आहे.

Onion Market
Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

कांदा खरेदी ही शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत होत असल्याने त्याविषयी विविध प्रकारचे समज-गैरसमज तसेच त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा असून तक्रार आहे.

त्यामुळे नाफेड ‘एनसीसीएफ’मार्फत होणारी कांदा खरेदी इतर व्यापारी वर्गाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड लिलाव पद्धतीने खरेदी करून त्यापुढील विक्रीची प्रक्रिया करावी अशी मागणी सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह, व्यापारी, बाजार समित्यांचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांची देखील आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com