Mulberry Cultivation : बुलडाणा जिल्ह्यात ६२७ एकरांवर तुतीची लागवड

Mulberry Farming : पारंपरिक पिकांच्या जोडीला शेतकरी नवनवीन पर्याय शोधत आहेत. यंदा जिल्ह्यात सुमारे ६२७ एकरांवर तुतीची लागवड झाली असून रेशीम शेतीकडे शेतकरी वळू लागले आहेत.
Mulberry
Mulberry Agrowon
Published on
Updated on

Buldhana News : पारंपरिक पिकांच्या जोडीला शेतकरी नवनवीन पर्याय शोधत आहेत. यंदा जिल्ह्यात सुमारे ६२७ एकरांवर तुतीची लागवड झाली असून रेशीम शेतीकडे शेतकरी वळू लागले आहेत. ५२३ शेतकऱ्यांनी यंदा ही लागवड केली आहे.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळवण्यासाठी गेल्या काळात जनजागृती करण्यात आली. इतर पिकांच्या तुलनेत शाश्‍वत उत्पन्नाची शक्यता पाहता शेतकरी याकडे वळत आहेत. यंदा मनरेगाअंतर्गत ३३५ एकर आणि उर्वरित २९० क्षेत्रांवर सिल्क समग्र-२ या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी नोंदणी झालेली आहे.

Mulberry
Mulberry Cultivation : तुती लागवडीच्या सुधारित पद्धती

आतापर्यंत २०० एकर क्षेत्रांवर तुती लागवड पूर्ण झाली आहे. राज्यात सन २०२१-२२ मध्ये तुती लागवडीखाली असलेले १४ हजार ९०५ हेक्टर क्षेत्र सन २०२३-२४ मध्ये १८ हजार ६०७ हेक्टरवर पोहोचले आहे. यात सुमारे ३ हजार ७०२ हेक्टरने वाढ झाली आहे.

Mulberry
Mulberry Farming : तुती बागेमध्ये आच्छादन महत्त्वाचे...

आधुनिक पद्धतीने शेती करण्याकडे अनेक शेतकरी वळत आहेत. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी विविध प्रयोग करून अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पारंपरिक पिकासोबतच तुती लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याची क्षमता असलेला रेशीम उत्पादन हा कृषी आधारित उद्योग आहे. तुती रेशीम विकास कार्यक्रमांतर्गत बुलडाणासह राज्यातील २४ जिल्ह्यात तुती लागवडीवर भर दिल्या जात आहे.

जून ते सप्टेंबर तुतीची लागवड

जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तुती लागवड केली जाते. पूर्वी तुतीच्या फांदीपासून कलम तयार करून लागवड करण्यात येत होती. त्यामध्ये २० ते २५ टक्के तूट, खाडे पडत असल्यामुळे एकरी ५ हजार ५०० झाडांची संख्या राखली जात नव्हती. पर्यायाने प्रति एकर २०० अंडिपुजाचे संगोपन होत नव्हते. आता तुतीच्या तीन महिने पूर्ण वाढ झालेल्या रोपांपासून लागवड केली जाते. मनरेगाअंतर्गत तुती लागवडीसाठी रोपे खरेदी व मजुरीचा खर्च देखील दिला जात असल्याने तुती लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com