Mulberry Cultivation : तुती लागवडीच्या सुधारित पद्धती

Silk Farming : तुती पानांच्या उत्पादनासाठी एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत खर्च येतो. तुती बागेतील आंतर मशागत आणि पाने, फांद्या तोडणीसाठी ६५ ते ७० टक्के खर्च येतो.
Mulberry Cultivation
Mulberry CultivationAgrowon
Published on
Updated on

डॉ.सी.बी.लटपटे, डी.एन.मोहोड

Tuti Cultivation : तुती पानांच्या उत्पादनासाठी एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत खर्च येतो. तुती बागेतील आंतर मशागत आणि पाने, फांद्या तोडणीसाठी ६५ ते ७० टक्के खर्च येतो. हे लक्षात घेता सुधारित तंत्राने लागवड आणि लहान यंत्राच्या साह्याने पीक व्यवस्थापन फायदेशीर ठरते.

भाग ः २

खड्डा पद्धत (३ फूट बाय ३ फूट)

लहान शेतक­ऱ्यांकडे माळाची, डोंगर माथ्यावरील हलकी जमीन असते. अशा ठिकाणी उताराच्या विरुद्ध दिशेने १.५ फूट खोलीचा चर खोदावेत. चरालगत खालील बाजूने ३ फूट बाय ३ फूट अंतरावर ४५ बाय ४५ बाय ४५ सेंमी खोलीचे खड्डे करावेत. त्यास ठिबक सिंचन व्यवस्था केली तर पडीक जमिनीवर चांगल्या प्रकारे रेशीम शेती करणे शक्य होते.

तीन मीटर ओळ तुती लागवड पद्धत

या लागवड पद्धतीमध्ये ३ फूट अधिक ३ फूट अधिक ४ फूट बाय ३ फूट अधिक ३ फूट अधिक ४ फूट अशा पद्धतीने लागवड करता येते. एकूण ६ ते १२ एकर लागवड असणाऱ्या किंवा मोठ्या क्षेत्रावर तुती लागवड असणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण यांत्रिकीकरणासाठी ही पद्धत विकसित करण्यात आली आहे. यामध्ये ट्रॅक्टरचलित सर्व प्रकारची यंत्रे चालवता येतात. यात दोन झाडांत ३ फूट आणि दोन ओळीत ३ फूट अंतर ठेवण्यात आले आहे.

Mulberry Cultivation
Mulberry Cultivation : सुधारित पद्धतीने तुती लागवडीचे व्यवस्थापन

तुती लागवड लागवड पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास

लागवड िववरण जोड ओळ पद्धत (५’+३’) × २’ खड्डा पद्धत (३’x ३’) ३ मीटर रो पद्धत

(३’+३’+४’) ×

(३’+३’+४’)

प्रति एकर झाडांची संख्या ५,५५५ ४,९३८ ३,९६९

नांगरणी ट्रॅक्टर/पावर टिलरच्या सहाय्याने नेहमीसाठी उपयुक्त उपयुक्त नाही नेहमीसाठी उपयुक्त

ठिबक सिंचन सुविधेसाठी व्यवस्था कमी खर्च लागतो. खर्च लागतो. खर्च लागतो.

ट्रॅक्टरच्या साह्याने आंतरमशागतीस उपयुक्त उपयुक्त उपयुक्त नाही खूप फायदेशीर

पानाचे उत्पादन जास्त पानाचे उत्पादन मिळते. पानाचे उत्पादन मध्यम स्वरुपात मिळते. पानाचे उत्पादन मध्यम स्वरूपात मिळते.

पानाची गुणवत्ता एकदम चांगली मध्यम मध्यम

एकरी तुती झाडांची संख्या

लागवडीचे अंतर : पट्टा पद्धत झाडांची संख्या

५’+ (३’ × २’) ५,५५५

६’+ (३’ × २’) ४,९३८

लागवडीचे अंतर : सरी पद्धत

४’× २’ ५,५५५

३’ × ३’ ४,९३८

लागवडीचे अंतर : खड्डा पद्धत

३’ × ३’ ४,९३८

-------------

डॉ.सी.बी. लटपटे, ७५८८६१२६२२

डी. एन. मोहोड, ९४०३३९२११९

(रेशीम संशोधन योजना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com