
संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : आवक जेमतेम असलेल्या मोसंबीचे छत्रपती संभाजीनगर व जालना बाजार समितीमध्ये दर दबावातच राहिले. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये मोसंबीच्या आवकेत सातत्य तर जालना बाजार समितीमध्ये मात्र आठवड्यात तीन वेळाच मोसंबीची आवक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये १८ ते २६ मार्च दरम्यान मोसंबीची एकूण २८० क्विंटल आवक झाली. २३ ते ५१ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या मोसंबीला कमाल १०७५०, तर किमान ३३५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला.
जालना बाजार समितीमध्ये १८ ते २५ मार्च दरम्यान मोसंबीची केवळ तीन वेळा आवक झाली. १८ मार्चला ९५३ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे सरासरी दर १३०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १९ मार्चला १००७ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला सरासरी १२५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. २२ मार्चला ९१२ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे सरासरी तर १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असलेल्या मोसंबीची जालना, पाचोड, छत्रपती संभाजीनगर बाजार समित्यांमध्ये बऱ्यापैकी आवक होत असते. याशिवाय थेट बांधावरूनही मोसंबीची खरेदी करण्याला व्यापारी प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे साधारणतः ३० टक्क्यांपर्यंत आहे. दोन्ही बाजार विधानसभा मराठवाड्यात खरेदी केली जाणारी मोसंबी प्रामुख्याने उत्तर भारतात पाठविली जाते.
व्यापारी सूत्रांच्या माहितीनुसार, आताच्या घडीला मृग बहराची मोसंबी तोड अंतिम टप्प्यात आहे. मोसंबीच्या बहरानुसार आपल्याकडील मृग बहारातील मोसंबी बाजारात डिसेंबर ते एप्रिलदरम्यान सुरू होते. तर मार्च ते जूनपर्यंत आंध्र प्रदेशातील मृग बहराची मोसंबी बाजारात येते. आंबिया बहराची आंध्रातील मोसंबी साधारणपणे जुलैमध्ये बाजारात येते तर मराठवाड्यातील मोसंबी ऑगस्टमध्ये बाजारात येते. त्यानुसार आणखी किमान महिनाभर मराठवाड्यातील मोसंबीचा हंगाम सुरू राहण्याची आशा आहे. होळीपासून आंध्रातील मोसंबीची आवकही बाजारात सुरू झाली आहे. त्याचा थेट परिणाम दरावर झाल्याची स्थिती आहे. दुसरीकडे या वेळी लांबलेल्या पावसामुळे उत्तर भारतात थंडीही लांबली होती. त्यामुळे आपल्या मोसंबीच्या विक्रीचा डोलारा असलेल्या उत्तर भारतातील बाजारपेठेतून मोसंबीच्या मागणीत कमतरता आल्याने मोसंबीचे दर कमीच होते.
जालन्यातून अनेक राज्यांत जाते मोसंबी
जालना बाजारपेठेत खरेदी केली जाणारी मोसंबी साधारणपणे राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड आदी राज्यांत जाते. सुरुवातीला मिळालेले दर नंतर फारसे काही वाढले नाही. तीच स्थिती आताही कायम असून मोसंबीचे दर दबावातच असल्याचे चित्र.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.