Unpaid Water Bills: मोरगाव प्रादेशिक योजना थकबाकीमुळे अडचणीत

Morgaon Water Crisis: बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांसाठी गेली अनेक वर्षांपासून वरदान असलेली मोरगाव प्रादेशिक योजनेची पाणीपट्टी थकबाकी सहा कोटी ५३ लाख ४६ हजार १७० असून, थकबाकीमुळे ही योजना डबघाईला आली आहे.
Water Bill
Water BillAgrowon
Published on
Updated on

Pune News : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांसाठी गेली अनेक वर्षांपासून वरदान असलेली मोरगाव प्रादेशिक योजनेची पाणीपट्टी थकबाकी सहा कोटी ५३ लाख ४६ हजार १७० असून, थकबाकीमुळे ही योजना डबघाईला आली आहे.

१९९८ मध्ये सुरू झालेली ही योजना गेल्या अनेक वर्षात १०० टक्के वसुली या चौकटीत कधीच बसली नाही. थकबाकीमुळे अडचणीत आलेली योजना पाणी वापरत असलेल्या गावांकडे हस्तांतर करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केला होता. मात्र, योजना चालवणे आणि पाणीपट्टी वसुली करणे यासाठी एकाही ग्रामपंचायतीने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

Water Bill
Mohol Water Issue : मोहोळमधील चार गावांचा पाणीप्रश्न निकाली

बारामती पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याकडून या योजनेचे पाणी वापरत असलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व प्रादेशिक योजना चालवणारे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची समन्वय बैठक झाली. मात्र, एकाही ग्रामपंचायतीने योजना चालविण्यासाठी प्रतिसाद दिला नाही.

त्यामुळे सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर खासगी यंत्रणेकडून चालवली जात आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीची परिस्थिती थकबाकीच्या चक्रव्यूहात कायमच राहिल्यामुळे ही योजना चालविण्यास खासगी यंत्रणेकडूनही फारसा उत्साह नाही. दर महिन्याला येणारा खर्चही वसुलीमधून निघत नसल्याची खंत ही योजना चालवणारे रोहिदास रासकर यांनी व्यक्त केली.

Water Bill
Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

थकबाकी वसुलीसाठी अनेकवेळा पाणीपुरवठा स्थगित केला जात आहे. मात्र, थकबाकीपेक्षा अतिशय अल्प रक्कम भरून पाणी चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून तगादा लावला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली. डबघाईला आलेल्या योजनेस नियमित पाणीपट्टी भरून संजिवनी देण्यासाठी योजनेचे पाणी वापरत असलेल्या ग्रामपंचायतींनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. ग्रामपंचायतींना थकबाकी भरण्यासंदर्भात नोटिशीद्वारे कळविण्यात आले आहे.

आंबी बुद्रुक, आंबी माळवाडी, आंबी खुर्द, भोंडवेवाडी, मावडी क.प, मोरगाव, तरडोली, पवारवाडी पाटी, लोणी भापकर, लोणी भापकर, पाटी वस्ती समिती, बाबुर्डी, कोकरे वस्ती, मासाळवाडी, माळवाडी लोणी, दगडे वस्ती, सावता माळीनगर, काऱ्हाटी हायस्कूल, जळगाव कडेपठार, कोकणे वस्ती, लोणकर वस्ती, चौलंग वस्ती, भिलारवाडी, जळगाव सुपे, कऱ्हावागज, अंजनगाव या गावांची मार्च २०२५ अखेर पर्यंतची थकबाकी सहा कोटी ५३ लाख ४६ हजार १७० रुपये आहे
विकास बुरसे, शाखा अभियंता, मोरगाव प्रादेशिक योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com