Mohol Water Issue : मोहोळमधील चार गावांचा पाणीप्रश्न निकाली

Water Crisis : मोहोळ विधानसभा मतदार संघातील चार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
Mohol Water Issue
Mohol Water Issue Agrowon
Published on
Updated on

Solapur News : मोहोळ विधानसभा मतदार संघातील चार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब आमदार राजू खरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर ,त्यांनी १७ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती.

Mohol Water Issue
Mhaisal Water Crisis : ‘उटगी, निगडी तलावांत ‘म्हैसाळ’चे पाणी सोडा’

त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हा प्रश्न सोडविण्याबाबत शब्द दिला होता. या प्रश्नावर बुधवारी (ता. २१) कालवा सल्लागार समितीची बैठक घेत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यासमोर आगृह धरत आमदार राजू खरे यांच्या मागणीची दखल घेतली.

Mohol Water Issue
Water Crisis : पंधरा दिवसांआड मिळते २० मिनिटे पाणी

कोळेगाव एस. के. एफ. २२ मधून सीना नदीत पाणी सोडण्याबाबतच्या ऑनलाईन सूचना पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे मुंडेवाडी, अर्जुंनसोंड, पोफळी, नांदगाव चार गावांचा पाणी प्रश्न निकाली निघाला असल्याची माहिती मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी दिली.\

मंत्रालयातील कालवा सल्लागार समितीची आढावा बैठकीसाठी जलसंपदा मंत्री विखे पाटील, ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजू खरे, आमदार समाधान अवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार, अभिजित पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार उत्तमराव जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार सुभाष देशमुख तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, सुधीर खांडेकर व जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com