Irrigation Department : जायकवाडी पाटबंधारे विभागाने केली विक्रमी पाणीपट्टी वसुली

Jayakwadi Irrigation Department : जायकवाडी पाटबंधारे विभागाने सिंचन पाणीपट्टी २ कोटी ७२ लाख तर बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली ६४ कोटी ४३ लाख वसूल केली.मागील दहा वर्षांतील विक्रमी पाणीपट्टी वसुलीचा उच्चांक विभागाने केला आहे.
Irrigation Department
Irrigation DepartmentAgrowon
Published on
Updated on

Paithan News : पैठण : जायकवाडी पाटबंधारे विभागाने सिंचन पाणीपट्टी २ कोटी ७२ लाख तर बिगर सिंचन पाणीपट्टी वसुली ६४ कोटी ४३ लाख वसूल केली.मागील दहा वर्षांतील विक्रमी पाणीपट्टी वसुलीचा उच्चांक विभागाने केला आहे.

मराठवाड्यातील जलवाहिनी समजल्या जाणाऱ्या नाथसागर (जायकवाडी प्रकल्प) मधून २०२४-२५ करिता उन्हाळी रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामासाठी सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. सिंचनातून समृद्धी हे ब्रीद वाक्य सार्थ करण्यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी नियोजन करून पाटबंधारे विभागाच्या अखत्या-यातील उपविभागांना सिंचन पाणीपट्टी वसुलीसाठी योग्य मार्गदर्शन केले

Irrigation Department
Sugarcane Bill : सांगली पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी वसुलीत कोंडी, कारखानदारांकडून खोडा

परीणामी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या सहा उपविभागातील सिंचन शाखेचे शाखाधिकारी व बीट प्रमुख, कालवा निरीक्षक, मोजनीदार, मंजूर, शिपाईसह आदी सिंचन कर्मचा-यांनी सिंचन पाणीपट्टी वसुलीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना सिंचनासाठी जनजागृती करून प्रयत्न केले. हेड ते टेल पर्यंत पाणी पोहचविण्याचे काम केले.

याकामी कडाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता दिपक कुमार डोंगरे, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता अशोक चव्हाण, उपविभागीय अभियंता बलभीम बुधवंत, उपविभागीय अभियंता राठोड, उप विभागीय अधिकारी अयाचित, शाखा अभियंता मंगेश शेलार, तुषार विसपुते, रितेश भोजने, कटकधोंड, संदीप कुर्ले, सातपुते, बाबासाहेब बोबडे, प्रभाकर तांगडे,बाळू गारूळे, प्रदीप बोरूडे, विशाल राजपुत, गणेश सोनवणे, नितीन गव्हाणे यांनीन वसुलीसाठी अथक प्रयत्न केले.

२०२४-२५ हंगामामध्ये जायकवाडी धरण शंभर टक्के क्षमतेने भरले. मागेल त्याला पाणी या न्यायाने लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झाली असून परीणामी सिंचन पाणीपट्टी वसुली सुध्दा गेल्या दहा वर्षांतील विक्रमी पाणीपट्टी वसुली झाली आहे.

प्रशांत जाधव (कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग पैठण

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com