Forest Fire : वणव्यात आंबा, काजूसह हजारहून अधिक झाडे जळाली

Mango Cashew Orchard : देवगड तालुक्यातील साळशी देवणेवाडीतील सत्यवान सावंत यांच्या घरानजीक असलेल्या आंबा आणि काजू बागेला आग लागली.
Forest Fire
Forest Fire Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील साळशी (ता. देवगड) आणि सडुरे (ता. वैभववाडी) येथील आंबा, काजूसह इतर हजारहून अधिक झाडे वणव्यात जळाली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सतत लागणाऱ्या आगीमुळे आंबा, काजू बागायतदार हैराण झाले आहेत.

देवगड तालुक्यातील साळशी देवणेवाडीतील सत्यवान सावंत यांच्या घरानजीक असलेल्या आंबा आणि काजू बागेला आग लागली. ही आग गुरुवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास लागल्यामुळे आगीचा भडका उडाला. त्यामुळे आग विझविणे कठीण झाले.

Forest Fire
Forest Fire : वणव्यामुळे निसर्गसंपदा धोक्यात

आगीत श्री. सावंत यांची मोठी १४ आंबा कलमे जळाली. याशिवाय काजूच्या काही झाडांचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्या अनुषंगाने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केले आहेत.

Forest Fire
Forest Fire : जंगलात आग लावाल तर दोन वर्षाची शिक्षा भोगाल

वैभववाडी तालुक्यातील सडुरे सोनधरणे येथे देखील गुरुवारी (ता. २१) दुपारी आग लागली. सडुरे सोनधरणे येथील विजयसिंह काळे, जनार्दन काळे, अजितसिंह काळे, जयसिंह काळे यांच्या बागेतील ५६५ काजूची, ३७ हापूसची, ५० बांबूची बेटे, २० सागाची याशिवाय इतर झाडे देखील जळाली. गवताची गंजी एक आणि १५० मीटर जलवाहिनी जळून खाक झाली.

आग विझविण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. दोन्ही ठिकाणच्या आगीत साधारणपणे एक हजारांहून अधिक झाडे जळाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com