Forest Fire : जंगलात आग लावाल तर दोन वर्षाची शिक्षा भोगाल

Team Agrowon

बारामतीतील जैवविविधतेला वणव्यांमुळे असलेला धोका लक्षात घेऊन, असे वणवे लावणाऱ्यांस कायदेशीर मार्गाने दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा वनविभागाने दिला आहे.

कोणी जंगलास आग लावणाऱ्यांचे नाव व पुरावे वनविभागास दिले तर अशा नाव कळवणाऱ्यास वनविभागाकडून योग्य बक्षीस दिले जाईल व त्याचे नाव गुपीत ठेवले जाईल.

Forest Fire | Agrowon

जर कोणी जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न केला तर अशा आरोपी विरुद्ध भारतीय वनअधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा कारवाई करण्यात येईल. अशा गुन्ह्यास दोन वर्षांची शिक्षा व ५ हजार रुपये दंड देखील होऊ शकतो.

Forest Fire | Agrowon

जंगलातील आगी रोखण्यात वेळोवेळी वनविभागास स्थानिक ग्रामस्थ, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, पर्यटक तसेच इतर प्रशासकीय विभागाची मदत झालेली आहे.

Forest Fire | Agrowon

जंगलातील आगीला प्रतिबंध म्हणून वनविभागाने वनक्षेत्रावर जाळपट्टे (जाळ प्रतिबंधित रेषा) घेतले आहेत.

Forest Fire | Agrowon

वनविभागाचे क्षेत्र हे बहुतेक रस्त्याच्यालगत असल्याने मद्यपान करणारे, सिगारेट फुंकणारे लोक रस्त्याच्या कडेला पेटती काडी वा सिगारेट टाकतात. तीच आग जंगल जळण्यास कारणीभूत ठरते.

Forest Fire | Agrowon

सजग नागरिकांनी देखील स्थानिक जैवविविधता टिकवण्यासाठी कोणत्याही जमिनीवर आग लावू नये.

Forest Fire | Agrowon