Maharashtra Rain Forecast : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

Latest Rain Update : कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २३) विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Rain Forecast
Rain Forecast Agrowon
Published on
Updated on

Weather Update Pune : कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २३) विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

तर उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

झारखंड आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, पश्‍चिम झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीपासून नैॡत्य उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, शिवपुरी, सिधी, गया, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. यातच सिक्कीमपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

Rain Forecast
Rain Deficit : पावसाळा ‘कोरडा’

राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामानासह पाऊस पडत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २३) विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

Rain Forecast
Maharashtra Monsoon : उद्याही पावसाचा जोर कायम राहील का? राज्यात अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी

तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत विजांसह पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com