Vegetable Market : मॉन्सूनचा भाजीपाला आवकेवर परिणाम, टोमॅटोच्या दरात दुपटीने वाढ

Vegetable Rate : उन्हाळ्यात घटलेली भाजीपाल्याची आवक त्यात पावसाची भर पडल्याने २० टक्क्यांनी बाजार समितीत आवक कमी झाली आहे.
Vegetable Market
Vegetable Marketagrowon

Market Rate Kolhapur : उन्हाळ्यात घटलेली भाजीपाल्याची आवक त्यात पावसाची भर पडल्याने २० टक्क्यांनी बाजार समितीत आवक कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. टोमॅटोचा माल खराब होत असल्याने दर दुपटीने वाढत आहेत. फ्लॉवर, बीन्स, गवार आवाक्याबाहेर जात आहे. तसेच भाजीपाला दरातही जोरदार तेजी निर्माण झाली आहे.

पालेभाज्यांचे भाव अद्याप रुळावर येताना दिसत नाहीत. ५० च्या पुढे गेलेले कोथिंबीरचे भाव जैसे थे आहेत. गायब झालेली शेपूची भाजी विक्रेत्यांकडे दिसू लागल्याने ग्राहक तुटून पडत आहेत. फळ बाजारात हंगामी फळांची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. चेरी, शिंगाडा आदी नवीन फळे दाखल होत आहेत.

आंब्याचा हंगाम आटोपता असून बेबी हापूस मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांकडे विक्रीस आहे. फूल बाजारात फुलांचे दर वाढत्या मार्गावर आहेत. येत्या काळात पावसामुळे दरवाढ सहन करावी लागणार आहे. खाद्यतेल बाजारात तेलाचा अपेक्षित उठाव होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. धान्य बाजारात मागील आठवड्यात वाढेलेले डाळींचे आणि तांदळाचे दर टिकून आहेत.

प्रति किलो रुपये भाज्यांचे दर-

टोमॅटो- ४० ते ५०, दोडका- ६० ते ८०, वांगी - ७० ते ८०, कारली- ५० ते ६०, ढोबळी मिरची- ८० ते १००, मिरची -८० ते ९०, फ्लॉवर - ७० ते ८०, कोबी- २० ते २५, बटाटा- ३० ते ३५, कांदा - ३० ते ३५, लसूण- २०० ते २५०, आले- १२० ते १४०, लिंबू - १५० ते ५०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स- २२० ते २५०, गवार - ८० ते १००, भेंडी-४० ते ५०, काकडी- ५० ते ६०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाज्या - २० ते २५, कोथिंबीर - ५० ते ६०, मेथी, शेपू - ३० ते ३५, शेवगा - ८ ते १० रुपये नग.

फुले : झेंडू - १२० ते १५०, निशिगंध - १०० ते १२०, गुलाब - १५० ते २००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - १८० ते २००.

Vegetable Market
Kolhapur Fruit Market : कोल्हापूर बाजारपेठेत करवंद, जांभळाचा दरवळ

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.

खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू- ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ८५ ते ८८, तूरडाळ- १७० ते १८०, मूगडाळ - ११५ ते १२०, मसूरडाळ - ८२ ते ९०, उडीदडाळ- १३० ते १४०, हरभरा- ७५ ते ७८, मूग- १२० ते १४०, मटकी- ११० ते १२०, मसूर- ७० ते ९०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ११० ते १४०, हिरवा वाटाणा- ९० ते १००, छोला -१४० ते १६०.

शेवग्याला आला भाव

शेवग्याला मागणी वाढली असून प्रति शेंगाचे दर दुपटीने वाढले आहेत. तसेच शुक्रवारी (ता. ७) सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश असल्याने या मिरगाला शेवग्याच्या भाजीला मोठी मागणी असते. या दिवशी भाजीला आहारात खूप महत्त्व असते. त्यामुळे बाजारात शेवग्याची भाजी विक्रीस आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com