Climate Change : हवामान बदलाने संकटात आलेल्या शेतीसाठी उपाययोजना करा

Re-Sowing Crisis : एकंदरीत यावर्षी मे महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला व मे महिन्यातच पेरणीस सुरुवात झाली आणि पेरणी झाल्यानंतर जून महिन्यापासून पावसाने दडी मारली तो पाऊस अजूनही झाला नाही.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Latur News : सततच्या हवामान बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यंदा मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी या महिन्यात पेरणी उरकली आणि पेरणीनंतर पावसाने दडी मारली तेव्हापासून पाऊस अजूनही झाला नाही.

मागील गेल्या चार - पाच वर्षांत एकतर कोरडा किंवा ओला दुष्काळ होत असल्याने हवामान खात्याने तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित करून याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी विधीमंडळात केली. 

वातावरणात मोठा बदल झाला आहे व सातत्याने होत आहे. हे आपण सर्वजण पाहतच आहोत. एकंदरीत यावर्षी मे महिन्यात पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला व मे महिन्यातच पेरणीस सुरुवात झाली आणि पेरणी झाल्यानंतर जून महिन्यापासून पावसाने दडी मारली तो पाऊस अजूनही झाला नाही.

Kharif Sowing
Kharif Sowing : अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचा सहा लाख हेक्टरवर पेरा

मे महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी उरकली आणि पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने आता शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अगोदर नक्षत्रावर पाऊस पडायचा २७ पैकी ९ नक्षत्र पाऊस असायचा आता नक्षत्रच गायब झाले आहेत. आता केवळ ओला किंवा कोरडा दुष्काळ असे दोनच नक्षत्र राहिले आहेत.

Kharif Sowing
Kharif Sowing: पुणे विभागात खरिपाचा ८९ टक्के पेरा

चार महिन्याच्या हंगामातील पिकावर तीन-चार वेळा संकट येतात मग शेतकऱ्यांनी शेती करायची कशी आणि सरकारने पंचनामा करायचा किती आणि मदत द्यायची किती हाही विषय या निमित्ताने पटलावर आला आहे.

गेल्या तीन-चार वर्षात एक तर कोरडा दुष्काळ झाला किंवा ढगफुटी सदस्य पाऊस झाल्याचे सांगून आमदार पवार यांनी या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी नितांत गरज असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हवामान विभाग, लोकप्रतिनिधी, कृषी तज्ज्ञांची कार्यशाळा घेऊन या विषयावर चर्चा करावी व यावर काय उपाययोजना करता येतील, याचा विचार करावा, अशी मागणी आमदार पवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com