India Monsoon : मॉन्सूनची वेळेत वर्दी

Monsoon Update : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनास पोषक हवामान झाले आहे. रविवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून अंदमान निकोबार बेट समूहावर दाखल होण्याची शक्यता आहे.
Monsoon
MonsoonAgrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनास पोषक हवामान झाले आहे. रविवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून अंदमान निकोबार बेट समूहावर दाखल होण्याची शक्यता आहे.

यातच देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये यंदा एक दिवस अगोदर म्हणजेच ३१ मे रोजी मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मॉन्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.

Monsoon
Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून साधारणत: १ जूनपर्यंत केरळमध्ये पोचतो. यात मॉन्सूनचे आगमन सात दिवस आधी किंवा उशिराने होऊ शकते. गतवर्षी मॉन्सूनने आठवडाभर वाट पाहायला लावली होती.

केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन आठ दिवस उशिराने म्हणजेच ८ जून रोजी झाले होते. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर वेगाने वाटचाल करत अवघ्या तीन दिवसांत (११ जून) मॉन्सून तळ कोकणात पोचला होता. यंदा मॉन्सून एक दिवस आधीच केरळमध्ये धडकण्याची शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे.

वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्वीपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण, चीनच्या दक्षिण समुद्रातून होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरात खालच्या थरात वाहणारे वारे, वायव्य प्रशांत महासागरातील समुद्र सपाटीलगतचा हवेचा दाब, ईशान्य हिंद महासागरात वरच्या थरात वाहणारे वारे हे सहा घटक विचारात घेऊन मॉन्सूनचे केरळातील आगमनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Monsoon
Pre Monsoon Rain : वळवाच्या पावसाची अनेक ठिकाणी हजेरी

यंदा नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. सध्या प्रशांत महासागरात असलेली एल-निनो स्थिती निवळू लागली आहे. मॉन्सून हंगामात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत.

तर मॉन्सून कालावधीत भारतीय समुद्रातील द्विधृविता (इंडियन ओशन डायपोल -आयओडी) धन (पॉझिटीव्ह) राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामातील पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.

मॉन्सूनचे केरळातील आगमन

वर्ष---आगमनाचा अंदाज---प्रत्यक्ष आगमन
२०१९---६ जून---८ जून
२०२०---५ जून---१ जून
२०२१---३१ मे---३ जून
२०२२---२७ मे---२९ मे
२०२३---४ जून---८ जून

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com