Pre Monsoon Rain : वळवाच्या पावसाची अनेक ठिकाणी हजेरी

Rain Update : मंगळवारी (ता. १३) दुपारनंतर सायंकाळपर्यंत पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली.
Rain Update
Rain Update Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील विविध भागात कमी अधिक प्रमाणात वळवाच्या पावसाची हजेरी कायम आहे. मंगळवारी (ता. १३) दुपारनंतर सायंकाळपर्यंत पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली.

मंगळवारी दुपारी संभाजीनगर शहरात काही भागात पावसाच्या हलक्या सरी झाल्या. लिंबेजळगाव परिसरात दुपारी मंगळवारी तीन च्या सुमारास जोरदार वादळी वारा व पाऊस सुरू झाला. पिशोर शिवारातही विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला होता. विजेच्या कडकडाटासह आडुळ येथील आठवडी बाजारात अवकाळी पावसाची हजेरी लागली.

Rain Update
Pre-Monsoon Rain : पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस सुरूच

अंधारीसह परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाल्याने तेथील आठवडी बाजाराची मोठी तारांबळ झाली. बिडकीन परिसरातील नंदलगाव शिवारात वीज पडून चार जनावरे दगावली नाचनवेल सह नादरपूर नायगाव निधोना परिसरात जोरदार पाऊस झाला लिंबे जळगाव परिसरातही पावसाची हजेरी लागली.

धाराशिव जिल्ह्यातील तुरोरी परिसरात पंधरा मिनिटांपासून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील जेवळी शिवारात रविवारी पूर्व मोसमी अति जोरदार पावसाने शेत जमिनीचे मोठे नुकसान केले होते. निवडणुकीत व्यस्त असलेल्या प्रशासनाकडून या नुकसानीच्या पाहणीची दखल मात्र घेण्यात आली नव्हती.

Rain Update
Heavy Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ सुरूच

जालन्यातील अंबड शहरासह अंबड तालुक्यातील अमलगाव हनुमान नगर किनगाव आदी परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. किनगाव (ता. अंबड) येथे मंगळवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अतोनात नुकसान झाले.

किनगाव येथील अनेक घरावरील पत्रे उडाले. अनेकांचा निवारा वादळी पावसाने हिरावला आहे. तर ठिकठिकाणी दहा ते पंधरा झाडे मोडून पडली आहे. विद्युत खांब व तारा देखिल तुटल्या आहे.तर अनेक ठिकाणी जनावराचे गोठे देखिल उडून गेले आहे. तसेच सौऊर्जेचे सोलरपंपच्या पाट्या उडून गेल्या आहे.

जनावराचे चाऱ्यांच्या गंजी उडून दाणादाण झाली. आंब्याचे झाडे, कडुलिंबाचे, बाभळीचे मोठे मोठे झाडे उन्मळून पडलो. मुऱ्हाडे राजपूत वस्तीवरील विलास भागचंद मुऱ्हाडे यांच्या घराचे पत्रे उडाली असून मोठे नुकसान झाले. किनगाववाडी येथे वीज पडून म्हैस दगावली. त्यामुळे शेतकरी सुभाष कप्पू बैनाडे यांचे अंदाजे ७० ते ८० हजार रुपये नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थ कडून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com