Uddhav Thackeray On Farmers: मोदींना विदेशाची पर्वा, शेतकऱ्यांचं काय? उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Farmers Rights: शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर तीव्र टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. त्रिभाषा सूत्राविरोधातील विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आज (ता.५) वरळी डोम येथे कार्यक्रमात बोलत होते.
Uddhav Thackeray On Farmers
Uddhav Thackeray On FarmersAgrowon
Published on
Updated on

News: शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर तीव्र टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. त्रिभाषा सूत्राविरोधातील विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे  आज (ता.५) वरळी डोम येथे कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी "मोदींना विदेशाची पर्वा, पण शेतकऱ्यांचं काय?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशात फिरण्यासाठी खूप वेळ आहे, पण आपल्या देशात काय चाललंय याची त्यांना अजिबात पर्वा नाही. आपल्या देशातले शेतकरी आज खूप मोठ्या संकटातून जात आहेत.

Uddhav Thackeray On Farmers
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची सरकारवर शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेवरून जोरदार टीका

त्यांच्याकडे शेती करण्यासाठी ना बैल आहेत, ना औत आहे. तरीही शेतकरी आपल्या खांद्यावर जोखड घेऊन, रक्ताचं पाणी करून पिकं पिकवत आहेत. पण सरकारकडून त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. शेतकऱ्यांची दैना झाली आहे आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे."

Uddhav Thackeray On Farmers
Maharashtra Farmer Issue: संत्रा बागांवरील फायटोप्थोरा नुकसानीबाबत मदतीची मागणी

त्रिभाषा सूत्राविरोधातील लढ्याचा विजय साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा विशेष ठरला कारण यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तब्बल १८ वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले.

सोबतच या मेळाव्याला सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, अजित नवले, दीपक पवार, आणि प्रकाश रेड्डी या नेत्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीसह शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधलं.

दरम्यान, शेतकऱ्यांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खतं-बियाण्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागतं, पण कर्जाची परतफेड करणंही त्यांना जड जात आहे.

शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे.पिकांचा योग्य भाव मिळत नाही. सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, योग्य भाव आणि आधुनिक शेतीसाठी साधनं उपलब्ध करून द्यायला हवीत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com