
Buldana News : शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतमालाला योग्य भाव देण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी काँग्रेसने सोमवारी (ता. ३) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
राज्यात सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, श्याम उमाळकर, प्रकाश पाटील, ॲड.विजय सावळे, अशोकराव पडघान, डॉ. सत्येंद्र भुसारी, अविनाश ऊमरकर, अनंत वानखेडे, डी. टी. मवाळ, लक्ष्मणराव घुमरे, नंदू बोरे, विश्वदीप पडोळ, शिवराज पाटील, सचिन बोंद्रे, डॉ. ईसरार , मंगलाताई पाटील, अनिरुद्ध मापारी, समाधान सुपेकर, रामेश्वर वायाळ या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
सोयाबीनला ७००० रुपये भाव मिळाला पाहिजे, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करा या मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यात आले. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीसुद्धा करण्यात आली. शिवाय परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या शेतमालावर ४० टक्के आयात कर लावण्यात यावा.
शेतकऱ्यांना किमान केंद्राच्या हमीदराने भाव मिळावा, कृषी मालाच्या हमी भावाची किंमत ही कृषिमूल्य आयोगाने उत्पादन खर्चावर आधारित ज्या नवीन शिफारशी केल्या आहेत, त्या प्रमाणे शेतमालाच्या किमती वाढवून देण्यात याव्यात, नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा देण्यात यावा व ती रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करू नये,
जिल्हयात दर दिवसाला शेतकरी आत्महत्या होत आहेत, याची शासनाने संवेदनशिलतेने नोंद घेत जिल्ह्याचा आर्थिक विकास आराखडा तयार करावा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीजपुरवठा अखंडित करावा, सोयाबीनला सात हजार, तूर ९०००, ज्वारी ४०००, कापूस ९०००, मका ३००० आणि हरभरा पिकाला ७००० रुपये अशा उत्पादन खर्चावर आधारित भाव जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.