Modern Technology : आधुनिक तंत्रज्ञान शिवारापर्यंत पोहोचविणार

Technology for Farming : अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसारख्या या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचीही मदत घेतली जाईल, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी होणाऱ्या प्रयोगांनाही शासन प्रोत्साहन देईल.
Krushik 2025
Krushik 2025Agrowon
Published on
Updated on

Baramati News : अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसारख्या या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचीही मदत घेतली जाईल, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती करण्यासाठी होणाऱ्या प्रयोगांनाही शासन प्रोत्साहन देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘कृषिक २०२५’ प्रदर्शनाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १६) अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन व पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘ऑक्स्फर्ड’चे संचालक डॉ. अजित जावकर, ‘नाबार्ड’चे व्यवस्थापक प्रदीप बाराते, डॉ. पीयूष सोनी, डॉ. चक्रवर्ती, डॉ. महानंद माने, संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

Krushik 2025
Krushik 2025 : शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून पीक पद्धतीत बदल करावा : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

अजित पवार म्हणाले, की तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याच्या दृष्टीने काही प्रस्ताव असतील तर ते सादर करा, जेणेकरून येणाऱ्या अर्थसंकल्पात त्या बाबत निधीची उपलब्धता विचारात घेत तरतुदी करता येतील. राज्यातील कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यायला हवी, या बाबत सूचना दिल्या जातील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रातील वापर वाढण्यासाठी शासन प्रोत्साहन देईल.

माणिकराव कोकाटे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ॲग्रीस्टार्ट पोर्टल सुरू करण्याचा विचार सुरू आहे, अनावश्यक बाबी बंद करून आवश्यक बाबींचा अंतर्भाव कृषी विभाग या पुढे करेल. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला संशोधन व इतर बाबींसाठी जागेची गरज असल्यास कृषी विभाग जागा उपलब्ध करून देईल. कृषी विभागात अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा आम्ही प्रयत्न करू.

Krushik 2025
Krushik 2025 : अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती किफायतशीर करण्याचे प्रयोग

पंकजा मुंडे म्हणाल्या, की हे प्रदर्शन पाहिल्यानंतर आमच्या परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अनेक योजना डोक्यात आल्या आहेत, त्यावर आम्ही काम करू. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन बरेच शिकता आले. शरद पवार म्हणाले, की भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेला सर्वच क्षेत्रात महत्त्व प्राप्त होणार आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे हे तंत्रज्ञान असेल, राज्याचे शेतीचे अर्थकारण उसावर अवलंबून असल्याने उसाचा प्राधान्याने विचार केला, भविष्यात इतर पिकांबाबतही हा विचार होईल. ऑक्स्फर्ड व मायक्रोसॉफ्टने मदत केल्यामुळे हा प्रयोग अधिक यशस्वी होईल.

मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून बारामती कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत जगाच्या नकाशावर गेल्याचे मला समाधान असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रातील वापर निश्‍चितच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संस्थेचे सीईओ नीलेश नलावडे व सहकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात आढावा घेतला. प्रदर्शनातील बाबींची त्यांनी माहिती दिली.

जगाने घेतली बारामतीच्या संशोधनाची नोंद : प्रतापराव पवार

प्रतापराव पवार यांनी सांगितले, की वॉशिंग्टननंतर बारामतीत ‘फार्म ऑफ द फ्यूचर’ मायक्रोसॉफ्टने सुरू केले. सत्या नाडेला यांनी या प्रयोगाची नोंद घेतली, त्या माध्यमातून जगाने बारामतीच्या संशोधनाची नोंद घेतली आहे. ऑक्स्फर्ड, मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्‍स फाउंडेशन हे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत काम करत असल्याने याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद

प्रदर्शनाचा गुरुवार (ता.१६) हा पहिलाच दिवस असतानाही हजारो शेतकऱ्यांनी शेतीमधील ज्ञान तंत्रज्ञानाची भरपूर माहिती घेतली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची आणि शेती तज्ज्ञांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. या वेळी हे प्रदर्शन शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरविण्यासाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट प्रमुख राजेंद्र पवार, सीईओ नीलेश नलावडे, तसेच कृषी विज्ञान केंद्र प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्याचे दिसून आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com