Agriculture Technology : तंत्रज्ञान वापरातून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन

Agricultural Innovation : नाशिक जिल्ह्यातील खेडगाव (ता. दिंडोरी) येथील जेऊघाले कुटुंबीय चार दशकांपासून प्रयोगशीलतेने द्राक्ष शेतीत कार्यरत आहेत. बाजारपेठेतील मागणीनुसार रंगीत व सफेद अशा विविध वाणांची लागवड, सौरऊर्जेचा वापर, सिंचन व अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी ‘ऑटोमेशन, उपयुक्त सेन्सर्स व स्वयंचलित हवामान केंद्र वापरातून ते दरवर्षी द्राक्षाचे निर्यातक्षम उत्पादन घेतात.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

Technology in Farming : नाशिक जिल्ह्यातील खेडगाव (ता. दिंडोरी) येथील जेऊघाले कुटुंबीय चार दशकांपासून प्रयोगशीलतेने द्राक्ष शेतीत कार्यरत आहेत. बाजारपेठेतील मागणीनुसार रंगीत व सफेद अशा विविध वाणांची लागवड, सौरऊर्जेचा वापर, सिंचन व अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी ‘ऑटोमेशन, उपयुक्त सेन्सर्स व स्वयंचलित हवामान केंद्र वापरातून ते दरवर्षी द्राक्षाचे निर्यातक्षम उत्पादन घेतात. दरवर्षी युरोपीय बाजारपेठेला त्यांचा माल रवाना होतो.

सिंचन व अन्नद्रव्ये व्यवस्थापन

आधुनिक पद्धतीने ‘वेबबेस ऑटोमेशन’ यंत्रणा बागेत बसवली आहे. त्याद्वारे संपूर्ण ८ एकर क्षेत्रावर केंद्रिकृत पद्धतीने सिंचन व विद्राव्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. वेळ, मात्रा (व्हॉल्यूम) आणि (सेन्सर बेस्ड मोड) अशी ही प्रणाली उपयुक्त ठरते आहे. बागेचे व्यवस्थापन अचूक वेळेत क्षेत्रनिहाय करता येते. श्रम व खर्चात बचत होते. माती, पाणी, पान, देठ परीक्षणातून देण्यात आलेल्या खतांचा कार्यक्षम वापर होतो. एकसमान दाब पद्धतीने पाण्याचे विचरण होते. सामू नियंत्रण होते. पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत विद्राव्य खते मुळांपर्यंत पोचतात. त्यामुळे मुळ्यांची कार्यक्षमता वाढते. वेल सुदृढ होते.

Grape Farming
Agriculture Technology : पेशींमध्ये जीवन आणि मृत्यू यांच्यातील अचूक सीमा निश्चित करण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न

सौरचलित ऊर्जानिर्मिती

पूर्वी भारनियमानामुळे आठवड्यातून चार दिवस रात्री पाणी द्यायला जावे लागे. ते धोकादायक होतेच, शिवाय वीजबिलाचा खर्च, श्रम अधिक होते. त्यामुळे दोन लाख रुपये गुंतवणूक करून पाच केव्ही क्षमतेची सौर ऊर्जा आधारित वीजनिर्मिती प्रणाली कार्यान्वित केली. त्यामुळे दिवसा द्राक्ष रोपांसह बागेत सिंचन व्यवस्थापन करणे सोपे झाले. रात्री तसेच थंडीच्या दिवसात पाणी द्यायला जाण्याची चिंता मिटली. आजमितीला ११ लाख रुपये गुंतवणूक करून २५ केव्हीपर्यंत वीजनिर्मिती क्षमता विकसित केली आहे. त्यावर ०.५ ते ५ अश्‍व शक्ती क्षमतेचे सुमारे १३ पंप व संबोधित प्रणाली चालविली जाते. उन्हाळ्यात पिकांना पाण्याची अधिक गरज असते. याच काळात सूर्यप्रकाश अधिक मिळत असल्याने वीजनिर्मिती सुलभरीत्या होते. त्यातून वीजबिल खर्चात ७० टक्के बचतही झाली आहे.

हवामान केंद्रामुळे काटेकोर व्यवस्थापन

पाच वर्षांपासून बागेत स्वयंचलित हवामान केंद्राचा वापर केला जात आहे. बागेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मातीचे तापमान, आर्द्रता मोजणारे सेन्सर्स बसविले आहेत. सर्व माहिती ‘सर्व्हर’वर संग्रहित होते. त्यामुळे बदल व वर्तमान स्थिती थेट (Live) मोबाइलवर पाहता येते. अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन डॅशबोर्ड उपलब्ध होतो. त्याद्वारे मुळांच्या कक्षेभोवती ओलावा, मातीचे तसेच हवेतील तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, दिशा, वेग, पानांचा ओलावा, सूर्यप्रकाशाची तीव्रता, पर्जन्यमान आदी घटकांची माहिती मिळवता येते. त्यानुसार बागेतील अन्नद्रव्य व सिंचन व्यवस्थापन अचूक करता येते. किडी-रोगांच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज येऊन फवारणींचे काटेकोर नियोजन करता येते.

Grape Farming
Agriculture Technology : भाजीपाला उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

निर्यातक्षम गुणवत्ता

बागेत ओलांड्याचे अंतर जास्त ठेवले जात असल्याने एकसारखा सूर्यप्रकाश मिळतो. गोडी बहर छाटणीपश्‍चात गर्भधारणा चांगली होऊन घड सशक्त निघतात. पाने पिवळी पडत नाहीत. किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी तर फवारणी करताना ‘कव्हरेज’ चांगले मिळतो. एकरी १२ ते १३ टन द्राक्ष उत्पादन मिळते. सुमारे ८० ते ८५ टक्के उपदानाची निर्यातदारांमार्फत युरोपीय देशांना निर्यात होते. त्यास वाणांचा रंग व प्रकारानुसार किलोला ७०, ८० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळतो. निर्यातक्षम उत्पादनासाठी एकरी तीन लाखांपर्यंत खर्च येतो. मात्र काटेकोर व्यवस्थापन व तंत्रज्ञानातून द्राक्षांची गुणवत्ता वाढवण्यासह एकरी खर्चात १० टक्क्यांपर्यंत बचत केली आहे.

पॉलिहाउस व्यवस्थापन

पॉलिहाउसमध्ये द्राक्षाची रोपे तयार केली जातात. येथे विशिष्ट तापमान व आर्द्रता नियंत्रित करणे आवश्यक असते. या दोन्ही बाबींची गरज ‘सेन्सर’द्वारे व्यक्त केली जाते. त्यानुसार ‘आरओ प्लांट’द्वारे शुद्ध पाणी कूलिंग पॅडवर पडते. त्यानंतर पंखे सुरू होऊन तापमान नियंत्रित केले जाते. तसेच पॉलिहाउसमधील आर्द्रता प्रमाण टिकविण्यासाठी फॉगर्स वापरले जातात. सेन्सरच्या माध्यमातून यंत्रणा कार्यान्वित होत पाणी व विजेचा वापर प्रमाणात होतो. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज या कामात लागत नाही.

शेतीचा विस्तार

एकूण शेती- १३ एकर,

द्राक्ष लागवड ८ एकर

पाच एकरांत

द्राक्ष रोपवाटिका.

वाणांची विविधता

रंगीत- क्रीमसन, रेड ग्लोब

सफेद गोल वाण - सुधाकर सीडलेस व रतन सीडलेस.

सफेद लांबट वाण - आर के, एसएसएन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com