Farmer Loan Wavier: मंत्री बावनकुळेंनी घेतली बच्चू कडुंची भेट; मागण्यांवर झाली चर्चा

Protest For Farmers: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची शुक्रवारी (ता.१३) उपोषणस्थळी भेट घेतली. या भेटीत शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
Farmer Loan Wavier
Farmer Loan WavierAgrowon
Published on
Updated on

Amravati News: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची शुक्रवारी (ता.१३) उपोषणस्थळी भेट घेतली. या भेटीत शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. तर या भेटीनंतर उद्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचं सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.

निव्वळ आश्वासन देऊन आम्हाला कुणाचीही दिशाभूल करायची नाही, असं मंत्री बावनकुळे यांनी म्हणाले. "कर्जमाफी ही एका दिवसात घोषित करता येत नाही. शेतकऱ्यांची वर्गवारीनुसार त्याला कर्जमाफी द्यावी लागणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल, त्या समितीत बच्चू भाऊ यांना निमंत्रित करून त्यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली जाईल. यानंतर समिती जो निर्णय देईल, त्यानुसार आम्ही कर्जमाफी करू," असं आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिलं.

Farmer Loan Wavier
Bachchu Kadu Protest: बच्चू कडूंच्या आंदोलनाला राजू शेट्टी यांचा पाठिंबा

बावनकुळे यांच्या आश्वासनांनंतर बच्चू कडू यांनीही भूमिका स्पष्ट केली. बच्चू कडू म्हणाले, "सरकार कर्जमाफी व दिव्यांग मानधनवाढीबाबत सकारात्मक आहे. कर्जमाफीबाबत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची वर्गवारी ठरवली जाणार आहे. त्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. त्या समितीमार्फत अभ्यास करून चर्चा करून निर्णय घेतला जाईल. त्यानंतर आम्ही उद्या कार्यकर्त्यांशी बोलून आमचा निर्णय घेऊ," असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

पुढे बावनकुळे म्हणाले, बच्चू कडू यांनी केलेल्या १७ मागण्यापैकी १५ मागण्यांबाबत संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी स्वतः चर्चा करणार आहे. त्या लवकर मार्गी लावल्या जातील. तसेच दिव्यांगांच्या मानधनवाढीबाबत येणाऱ्या अधिवेशनात विषय मांडला जाईल. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.

Farmer Loan Wavier
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार; कृषिमंत्री कोकाटे यांची आमदार बच्चू कडू यांना ग्वाही

शेतकऱ्यांची कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांच अन्नत्याग आंदोलन सहा दिवसापासून सुरु आहे. आज सहाव्या दिवशी महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली. यावेळी आमदार प्रताप अडसरकर, आवलकर, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदि उपस्थित होते.

उपोषण सुरु झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बच्चू भाऊ यांच्यासोबत बोललो होतो. त्यावेळी तोडगा काढण्याची विनंती केली, असंही बावनकुळे म्हणाले. तसेच बच्चूभाऊंनी सांगितले की, राज्यातील महत्वाच्या चार मंत्र्यांशी बोलणे करून द्या. त्यावेळी मी त्या-त्या मंत्र्यांशी बोललो.

बच्चू भाऊंनी केलेल्या मागण्याचे काही मुद्दे आहेत की, ते तातडीने मान्य होऊ शकतात. आज मी ठरवलं आहे की, बच्चूभाऊंनी जे चार मंत्री सांगितले आहे. त्याची एकत्रित बैठक घेऊ. त्या बैठकीत बच्चूभाऊ यांना सोबत घेऊन त्या मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन आदेश काढण्याचं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com