Bachhu Kadu Hunger Strike: बच्चू कडू यांचे आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Maharashtra Farmer Protest: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यासह शेतकरी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग करणार आहेत.
Bachchu Kadu
Bachchu KaduAgrowon
Published on
Updated on

Amravati News: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यासह शेतकरी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधीजवळ आजपासून (ता. ८) या आंदोलनाची सुरुवात होईल.

सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी संकल्पपत्रात संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती. या माध्यमातून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला जाणार होता. परंतु निवडणुका संपल्यानंतर सत्ता स्थापन होऊनही बरेच महिने उलटूनही सरकारकडून या आश्‍वासनांची पूर्तता केली जात नाही, अशी स्थिती आहे.

Bachchu Kadu
Bacchu Kadu Protest: कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बच्चू कडू यांचे मशाल आंदोलन

याउलट असे आश्‍वासन दिलेच नाही, असे सांगत सरकारचे मंत्री यापासून पळवाट शोधत आहेत. आर्थिक विवंचनेतील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेत सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला वीमा संरक्षण मिळावे, शेतमजुरांचे आर्थिक हित जपण्याकरिता स्वतंत्र मंडळाची उभारणी व्हावी.

लागवड ते कापणीपर्यंतच्या सर्व शेतीकामांचा समावेश महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत करावा. हे शक्‍य नसल्यास तेलंगणाच्या धर्तीवर एकरी १० हजार रुपयांची मदत देण्यात यावी. रासायनिक खतांप्रमाणे सेंद्रिय तसेच मेंढी खतालादेखील अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी.

Bachchu Kadu
Farmer Protest: ‘एचटीबीटी’ला अडथळा केल्यास प्रतिकार

दुधातील भेसळ रोखत गाईच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीसाठी ६० रुपये प्रतिलिटर असा दर निश्‍चित करावा. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरिता ४० रुपये दर होईस्तोवर निर्यात बंदी लागू करू नये. २०२५-२६ या वर्षात उसाला प्रति टन ४३०० रुपये दर १ टक्‍का रिकव्हरी बेस धरून मिळावा.

तसेच पुढील ११ टक्‍के रिकव्हरीसाठी ४३० रुपये एफआरपी दर मिळावेत. प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून रिकव्हरी काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात यावी. १५ दिवसांत ऊस चुकारे न मिळाल्यास व्याजासह पैसे देण्यात यावेत, अशा विविध मागण्या बच्चू कडू यांनी सरकारकडे केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com