Bachchu Kadu Protest: बच्चू कडूंच्या आंदोलनाला राजू शेट्टी यांचा पाठिंबा

Hunger Strike Maharashtra: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारपासून (ता.८) बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाचा गुरुवारी (ता.१२) पाचवा दिवस असून, अद्यापही सरकार पातळीवर आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही.
 Bachchu Kadu Hunger Strike
Bachchu Kadu Hunger StrikeAgrowon
Published on
Updated on

Amravati News: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारपासून (ता.८) बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाचा गुरुवारी (ता.१२) पाचवा दिवस असून, अद्यापही सरकार पातळीवर आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळेच प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तीव्र आंदोलन केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह आमदार रोहित पवार,खासदार अमर काळे, सलील देशमुख, माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. ‘स्वाभिमानी’देखील राज्यात चक्का जाम आंदोलन करणार आहे.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, ऊस, दुधाला पुरेसा दर, दिव्यांगांना वाढीव मानधन त्यासोबतच इतर १७ विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधिस्थळाजवळ होत असलेल्या या आंदोलनाचा गुरुवारी (ता.१२) पाचवा दिवस होता. मात्र त्याची दखल सरकारकडून घेण्यात आली नाही.

 Bachchu Kadu Hunger Strike
Bacchu Kadu Strike: बच्चू कडूंच्या उपोषणाचा चौथा दिवस, सरकारला थेट निर्णयाचा इशारा

परिणामी गुरुवारी प्रहारकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. आर्वी (वर्धा) मतदार संघाचे आमदार दादाराव केचे यांचे वाहन थांबवीत त्यांना जाब विचारण्यात आला. बाळा जगताप, सुधीर जाचक, अंकुश गोटफोडे, छोटू चव्हाण, विक्रम भगत यांचा या आंदोलनात सहभाग होता. चांदूरबाजार तहसील कार्यालयावर प्रहार महिला संघटनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. अचलपूर बाजार समितीच्या टॉवरवर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चढत आत्मदहनाचा इशारा दिला. पिंपरी पूर्णा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले.

मोझरी येथे देखील आंदोलनाच्या समर्थनार्थ रक्‍तदान करून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. बाभूळगाव (यवतमाळ) येथे देखील सिंचन प्रकल्पात जलसमाधानी आंदोलन करण्यात आले. उमरखेड (ता. यवतमाळ) येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शासनाची प्रतीकात्मक अंतयात्रा काढत निषेध नोंदविला. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगावपेठ टोलनाक्‍यावर प्रहारकडून ‘रास्ता रोको’ करण्यात आले. डवरगाव (ता. तिवसा, जि. अमरावती) येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जमिनीत गाडून घेत अर्धदफन आंदोलन केले.

 Bachchu Kadu Hunger Strike
Bacchu Kadu Protest: कृषिमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बच्चू कडू यांचे मशाल आंदोलन

रोहित पवार यांनी घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी बच्चू कडू यांची आंदोलनस्थळी भेट घेत त्यांना पक्षाकडून पाठिंबा दर्शविला. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यामुळे त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकारची आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. खासदार अमर काळे, सलील देशमुख, माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनीही श्री. कडू यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शविला.

स्वाभिमानीचा पाठिंबा, ‘चक्का जाम’ करणार

बच्चू कडू यांनी शेतकरी हिताच्या अनेक मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग सुरू केला आहे. याला स्वाभिमानी शेतकरी संघटना पाठिंबा देत असून, शनिवारी (ता. १४) बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले जाईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com