District Annual Plan : वार्षिक योजनेचा निधी पूर्ण खर्च करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे : चंद्रकांत पाटील

Annual Plan : नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ व २०२३-२४ अंतर्गत राज्यस्तरीय यंत्रणा तसेच महानगरपालिका व नगरपालिकांच्या खर्चाचा आढावा प्रसंगी पालकमंत्री पाटील मार्गदर्शन करत होते.
District Annual Plan Meeting
District Annual Plan MeetingAgrowon

Solapur News : जिल्हा वार्षिक योजनेचा २०२२-२३ मध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी ९९.८५ टक्के निधी खर्च केलेला होता. त्याच पद्धतीने चालू वर्षाचा २०२३-२४ अंतर्गत ७४५ कोटी २८ लाख रुपयांचा निधीही सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी मार्च २०२४ अखेर शंभर टक्के खर्च करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योगमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता.१६) दिले. असे निर्देश उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योगमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, बबनदादा शिंदे, रणजीतसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल उगले-तेली, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, साहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, उप वनसंरक्षक धैर्यशील पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘सर्व राज्यस्तरीय यंत्रणा महापालिका व नगरपालिकांनी जानेवारी २०२४ अखेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ अंतर्गत मंजूर असलेल्या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांची सर्व प्रक्रिया त्वरित पूर्ण करून, डिसेंबर २०२३ पर्यंत संबंधित यंत्रणांनी कार्यारंभ आदेश देणे आवश्यक आहे.

District Annual Plan Meeting
Namo Shetkari Yojana : ‘नमो महासन्मान’ योजनेचा हप्ता दसऱ्यापूर्वी

त्याच पद्धतीने ज्या यंत्रणांकडे २०२२-२३ चा निधी शिल्लक आहे, त्या यंत्रणांनीही ऑक्टोबर २०२३ अखेर कामांचे कार्यारंभ आदेश दिले पाहिजेत,’’ असे निर्देश त्यांनी दिले.

सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करताना कामांची निकड, लोकप्रतिनिधींनी दिलेल्या शिफारशी/सूचना, सामान्य जनतेच्या मागण्यांना महत्त्व देऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करून प्रस्ताव सादर करावेत. सर्व यंत्रणांना कामे विहित वेळेत पूर्ण करावेत.तसेच मंजूर कामे, दर्जेदार व्हावीत, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी देऊन ज्या यंत्रणांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाही. त्यांनी तातडीने पूर्ण करावी, असेही पाटील म्हणाले.

District Annual Plan Meeting
Village Water Plan : राज्यातील २०० गावांमध्ये ग्राम जलआराखडे करण्याचे उद्दिष्ट

पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखड्याचाही आढावा

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. पंढरपूर मंदिर देवस्थान आराखड्याअंतर्गत विठ्ठल मंदिर संकुल जतन, संवर्धन व परिसर व्यवस्थापनाच्या ७३.५५ कोटी रकमेच्या विकास आराखड्यास या आधीच मान्यता देण्यात आली आहे.

District Annual Plan Meeting
Rabi Season : रब्बीसाठी साडेतीन लाख मिनीकिटचा होणार पुरवठा

या आराखड्यातील ३२.७९ कोटी रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. उर्वरित कामांची अंदाजपत्रके तयार असून, ती कामेही प्रशासकीय मान्यतेस्तव प्रस्तावित करण्यात आली आहेत.

या आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून त्याद्वारे मंदिराची प्राचीन शैली जपण्यास मदत होणार आहे. तसेच भाविकांनाही विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com