Soybean Pest Disease : सोयाबीनवरील कीड-रोग नियंत्रणाची लगबग

Agriculture Update : मंगरूळपीर तालुक्यातील या परिसरात खरीप पेरण्या आटोपल्या असून सोयाबीनची उगवणही चांगली झालेली आहे.
Soybean Farming
Soybean FarmingAgrowon
Published on
Updated on

Washim News : मंगरूळपीर तालुक्यातील या परिसरात खरीप पेरण्या आटोपल्या असून सोयाबीनची उगवणही चांगली झालेली आहे. आता या पिकावर प्राथमिक अवस्थेत येणाऱ्या विविध कीडरोगांचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच लगबग सुरू आहे. दररोज शेतांमध्ये फवारणीचे काम केले जात आहे.

यंदा या परिसरात समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पिकांची उगवणही चांगली झालेली आहे. पीक परिस्थिती समाधानकारक दिसत असतानाच सोयाबीनवर पाने खाणारी केसाळ अळी व इतर किडी दिसून येत आहेत.

Soybean Farming
Soybean Farming : काटेकोर नियोजनातून उत्पादनात राखले सातत्य

या किडींचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. शेतामध्ये सध्या समाधानकारक परिस्थिती आहे. आगामी काळात मात्र कीडरोगांचा प्रादुर्भाव किती असेल यावर लक्ष ठेवून आहे, असे जमकेश्वर येथील शेतकरी अशोक ठाकरे यांनी सांगितले.

Soybean Farming
Soybean Farming : सोयाबीनसाठी रुंद वरंबा सरी लागवड तंत्रज्ञान

तर कैलास लांभाडे म्हणाले, की विभिन्न किडींचा प्रादूर्भाव सोयाबीन व अन्य पिकांवर आढळत आहे. सातत्याने अशा किडी पिकांचे नुकसान करतात. शेतकऱ्यांना दर वर्षी यावर अधिक खर्च करावा लागतो.

सध्या सोयाबीनच पीक या भागात कुठे एक महिन्याचे तर कुठे १५ दिवसांचे झालेले आहे. पीक वाढीच्या अवस्थेत असून शेतकरी आंतर मशागतीसह कीडरोग नियंत्रणाच्या कामात गुंतलेला आहे. अधूनमधून पाऊस येत असल्याने पिकांच्या वाढीला पोषक ठरतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com