Soybean Farming : काटेकोर नियोजनातून उत्पादनात राखले सातत्य

Soybean Production : विनोद पाटील यांची १४ एकर शेती आहे. त्यात तीन ते चार प्रकारचे सोयाबीनचे वाण दरवर्षी ते घेतात. पेरणीआधी उन्हाळ्यात नांगरट करून जमीन चांगल्या प्रकारे तापू देतात.
Soybean Farming
Soybean FarmingAgrowon
Published on
Updated on

Soybean Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : सोयाबीन

शेतकरी : शेतकरी- विनोद पाटील

गाव : सुदी, तालुका- मालेगाव, जि. वाशीम

सोयाबीन क्षेत्र : १४ एकर (सुमारे)

विनोद पाटील यांची १४ एकर शेती आहे. त्यात तीन ते चार प्रकारचे सोयाबीनचे वाण दरवर्षी ते घेतात. पेरणीआधी उन्हाळ्यात नांगरट करून जमीन चांगल्या प्रकारे तापू देतात. त्यानंतर कुजलेले शेणखत एकरी दोन ट्रॉली याप्रमाणे देऊन दोन वखरपाळ्या देतात. यामुळे बियाणे एकसारख्या प्रमाणात पेरले जाते व एकसारखे उगवूनही येते.

वाणांमध्ये पीडीकेव्ही अंबा, एमएयूएस ६१२, फुले किमया ७५३ आदींचा वापर करतात. कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणांच्या लागवडीवर जास्त भर राहतो. वाणांची उगवण क्षमता तपासून पाहिली जाते. त्यानुसार एकरी किती किलो बियाणे पेरायचे हे ठरवतात. जर ९० टक्के उगवण असेल तर एकरी २२ ते २४ किलो या प्रमाणात पेरणी होते.

Soybean Farming
Soybean Crop Management : सोयाबीन कापणी, मळणी व साठवणुकीदरम्यान घ्यावयाची काळजी

अन्य व्यवस्थापन

पाटील सांगतात की थायामेथोक्झाम व कार्बेनडाझिम यांची बीजप्रक्रिया करतो. पेरणीत दोन तासांतील (ओळ) अंतर १५ इंच तर दोन दाण्यांतील अंतर तीन ते चार इंच ठेवतो. पेरणी जास्ती खोल होणार नाही याची काळजी घेतली जाते. कारण पेरणीयंत्र जर जास्त खोल प्रमाणात लागले तर बियाण्याची उगवणक्षमता कमी होते. झाडांची जास्त दाटी होणार नाही याची काळजी घेतली जाते.

ज्या शेतात निव्वळ सोयाबीन पेरायचे तिथे पट्टा पद्धतीचा वापर होतो. जिथे सोयाबीनसोबत आंतरपीक म्हणून तूर पेरायची आहे तिथे ती गादीवाफ्यावर घेतली जाते. खत नियोजनामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश

(एनपीके) तसेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये शिफारस व गरजेनुसार देतो. फवारणीद्वारेही अन्नद्रव्यांचा वापर करतो. दिलेली खते पाण्यासोबत वाहून जाणार नाहीत, त्यांचा पुरेपूर उपयोग व्हावा या पद्धतीने

हा वापर असतो. उगवणीपश्‍चात तणनाशकांचा वापर करतो. त्याचा वापर करताना जमिनीमध्ये ओलावा असणे फार महत्त्वाचे असते. चक्रीभुंगा किडीचे नियंत्रण करण्यासाठी प्रोफेनोफॉस कीटकनाशकाचा वापर करतो. पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांदरम्यानच्या अवस्थेत उंटअळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.

Soybean Farming
Cotton Soybean Management : कपाशी, सोयाबीनचे व्यवस्थापन महत्त्वाचे

त्यासाठीही कीटकनाशकाची फवारणी वेळेत व्हावी यासाठी दक्ष असतो. फुलाच्या अवस्थेत पीक खूप नाजूक राहते. याकाळात थोडेसे जरी नियोजन चुकले तरी फूलगळ होऊ शकते. या अवस्थेत पाण्याचा ताण बसत असल्यास तुषार सिंचनाद्वारे पाणी नियोजन करतो. पांढरी माशी ही यलो मोझॅक रोगाचा प्रसार करते. त्यामुळे या किडीचे नियंत्रण करणे फार महत्त्वाचे ठरते. लष्करी अळी आणि केसाळ ठिपक्याची अळी देखील आढळते. त्यांच्या फवारणीसाठी

धुरीजन्य कीटकनाशकाचा वापर टाळतो. कळीचे रूपांतर शेंगात होण्यासाठी झाडाची ताकद कमी पडू नये, शेंगा पूर्णपणे भरण्यासाठी व दाणे टपोरे होण्यासाठी देखील संजीवकांची फवारणी केली जाते. यावेळी पीक ७२ ते ७२ दिवसांचे झालेले असते. या व्यवस्थेत शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच यावेळी कीटकनाशक व बुरशीनाशक यांचा वापर करतो.

शेंगा भरण्यासाठी आणि दाण्यामध्ये तेलाचे प्रमाण वाढण्यासाठी गंधक, पोटॅश यांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यानुसार अन्नद्रव्यांचे नियोजन केले जाते. अशा प्रकारच्या व्यवस्थापनामुळे सोयाबीनचे एकरी ११ ते १३ क्विंटलपर्यंत उत्पादन दरवर्षी घेण्याचा प्रयत्न असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com