EU Farmer Protest : युरोपियन महासंघातील शेतकरी आंदोलनाच्या 'व्हायरल व्हिडिओ' मागील सत्य काय ?

मागच्या वर्षभरापासून युरोपियन युनियन देशात शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. स्पेन, फ्रान्स, नेदरलँडस जर्मनी या देशात मागील दोन वर्षांपासून शेती धोरणांची नव्याने घडी आखण्याचे प्रयत्न केले जात आहे.
EU Farmer Protest
EU Farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

सध्या तुम्ही सोशल मीडियावर फ्रान्समधील शेतकरी आंदोलनाची व्हिडिओ व्हायरल झालेली पाहिले असतील. एका व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरची एक भली मोठी रांग उभा आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओत शेतकरी सरकारी कार्यालयासमोर शेण, कचरा आणि गटारातील घाण टाकताना दिसत आहेत. आणि या व्हिडिओवर लिहिलेलं आहे की, फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचं शेण कचरा आणि गटारातील घाण सरकारी कार्यालयासमोर टाकून आंदोलन सुरू.

ते दोन्ही व्हिडिओ शेतकऱ्यांकडून शेयर केले जात आहे. कदाचित तुमच्या व्हॉटसअपवर तुम्ही हे व्हिडिओ पाहिले असतीलच. पण ते व्हिडिओ शेतकरी आंदोलनाचे आहेत, हे खरं असलं तरी ते फ्रान्समधील नाहीत. मग फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचं असं काही आंदोलन झालंच नाही? ते फेक व्हिडिओ आहेत? तर हो ते व्हिडिओ फेक आहेत. कारण त्यातील एक व्हिडिओ आहे २०२२ मध्ये नेदरलँड्समधील आंदोलनाचा आणि दूसरा आहे फेब्रुवारी २०२३ मध्ये फ्रान्समधील शेतकरी आंदोलनाचा. मग ते व्हिडिओ आता व्हायरल का होतायत? तर तेच समजून घेऊ या व्हायरल चेकमधून.    

युरोपियन युनियन शेतकऱ्यांचा असंतोष

मागच्या वर्षभरापासून युरोपियन युनियन देशात शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. स्पेन, फ्रान्स, नेदरलँडस जर्मनी या देशात मागील दोन वर्षांपासून शेती धोरणांची नव्याने घडी आखण्याचे प्रयत्न केले जात आहे. युरोपियन देशातील शेतकऱ्यांना तिथल्या सरकारकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुदान दिले जातात. प्रामुख्यानं कृषी निविष्ठावर अनुदान दिले जातात. त्यासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या पाणी, वीज, जमीन, इंधन यासारख्या इतर बाबींवरही कर सवलती दिल्या जातात. पण त्यावर रोख घालण्यासाठी त्या-त्या देशातील सरकारने कंबर कसलेली आहे. तर त्याचं कारण हवामान बदलाला आळा घालण्यासाठी. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी निविष्ठावर दिल्या जाणाऱ्या सवलती बंद किंवा कमी करण्याची भूमिका त्या-त्या देशातील सत्ताधाऱ्यांनी घेतलेली आहे.

EU Farmer Protest
Farmers Protest Delhi : दिल्लीत पुन्हा शेतकरी आंदोलनाचा एल्गार, प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक

व्हायरल होणारे व्हिडिओ नेमके कधीचे?

व्हायरल व्हिडिओमधील एक आहे नेदरलँडचा आणि दुसरा आहे फ्रान्सचा. नेदरलँडमधील शेतकरी आंदोलनाला दीड वर्ष उलटून गेलं आहे. तर फ्रान्समधील शेतकरी आंदोलनाला एक वर्ष होईल. व्हिडिओ आत्ता का व्हिडिओ व्हायरल का होत आहेत? त्याचं कारण २०२३ च्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी सरकारच्या शेती धोरणांच्या विरोधात फ्रान्समधील ब्रिटनी भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात तिथल्या शेतकऱ्यांनी सरकारी कार्यालयासमोर शेण आणि कचरा टाकत सरकारचा निषेध केला होता.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही फ्रान्सच्या काही भागात आंदोलनाचं लोण पसरलं होतं. पण त्या आंदोलनाचं स्वरूप छोटं होतं. फ्रान्स २४ या फ्रान्समधील वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार या आंदोलनात १०० ते २०० लोकांचा सहभाग होता. आणि ते आंदोलन लगचेच शांत झालं.

जर्मनीत शेतकरी आंदोलन

फ्रान्समध्ये शेतकरी आंदोलन घडत असताना दुसरीकडे मात्र जर्मनीत मागच्या आठवड्यापासून डिझेलवरील अनुदान कपात करणाऱ्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे जर्मन सरकारसमोर मोठा पेच उभा ठाकला आहे. या शेतकरी आंदोलनाचा रविवारी ७ दिवस होता. शेकडो ट्रॅक्टर घेऊन हजारो शेतकरी रस्त्यावर उतरलेली आहेत. जर्मनीतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर कचरा आणि शेण आंदोलनाची सुरूवात केली होती. पण शेवटी आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक होतं जर्मनीची राजधानी बर्लिनला घेरलं.

शेतकऱ्यांनी बर्लिन घेरल्याची बातमी समोर आली त्यानंतर सोशल मिडियावर हे दोन जुने व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. ते दोन्ही व्हिडिओ व्हायरल होत आपल्याकडेही पोहचले. म्हणजे आंदोलन युरोपियन महासंघातील जर्मनीत सुरू असलं तरी व्हिडिओ मात्र पूर्वीच्या शेतकरी आंदोलनाचे व्हायरल होत आहेत. त्यामुळे या आंदोलनाचे चुकीचे तपशील आपल्यापर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे खोट्या आणि चुकीच्या माहितीपासून सावध रहा. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com