Crop Management : पीक व्यवस्थापनासाठी माती परीक्षण आवश्‍यक

Soil Testing : परीक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारशी ठरविणे सुलभ होते.
Crop Management
Crop ManagementAgrowon
Published on
Updated on

Soil Heath : शाश्‍वत पीक उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून जमीन आरोग्य आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापनास अनन्य साधारण असे महत्त्व आहे. योग्य व्यवस्थापनाच्या अभावामुळे जमिनीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, जमिनीची सुपीकता खालावत चालल्याचे आढळून येत आहे.

शाश्‍वत शेती व्यवस्थापनामध्ये जमिनीची सुपीकता कायम राखून किफायतशीर पीक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असते. जमिनीची सुपीकता आजमाविण्यासाठी भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी करणे आवश्यक असते.

माती परीक्षणामुळे जमिनीच्या सर्व गुणधर्माची माहिती मिळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते आणि त्यानुसार रासायनिक खतांच्या मात्रा व शिफारशी ठरविणे सुलभ होते. त्यामुळे रासायनिक खतांवर होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो. परीक्षणामध्ये जमिनीचा सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र स्फुरद व पालाश किती आहे हे समजते. परिणामी, पिकांच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा करता येतो.

माती परीक्षणाचे फायदे

जमिनीतील घटकांचे प्रमाण समजते.

जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड, नियोजन करता येते.

खतांची संतुलित मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.

जमिनीची सुपीकता आजमावता येते, जमिनीचे प्रकार निश्‍चित करता येतात.

Crop Management
Soil Management : जमिनीची निचरा शक्ती सुधारणे गरजेचे...

मातीचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी

मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा, शेतात पीक असल्यास दोन ओळींतील जागेतून नमुना घ्यावा.

पिकास रासायनिक खत दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत संबंधित जमिनीतून माती नमुना घेऊ नये.

निरनिराळ्या प्रकाराच्या जमिनीचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत.

माती नमुना गोळा करताना किंवा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविताना रासायनिक खताच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत.

शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, जनावरे बसण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागामधून किंवा जवळून मातीचे नमुना घेऊ नयेत.

शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा. सर्वसाधारणपणे नमुना काढणे व प्रयोगशाळेत पाठविणे यामध्ये दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ नसावा. अन्यथा, माती पृथक्करण बदलण्याची शक्यता असते

Crop Management
Soil Health : मृदेच्या आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर आवश्यक

फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळ्या थरामधून घ्यावा. उदा. खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील ३० सेंमीपर्यंत मुरूम नसल्यास ३० ते ६० सेंमी थरातील दुसरा थर आणि खोल जमिनीत ६० ते ९० सेंमीपर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्रपणे घेऊन प्रयोगशाळेत पाठवावेत.

जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त- चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेंमीमधील क्षार बाजूला करून नंतरच नमुना घ्यावा.

सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी अथवा लाकडी अवजाराने मातीचा नमुना घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अथवा अन्य धातूची अवजारे अथवा उपकरणे, माती नमुना घेण्यासाठी वापरू नयेत. पिशवीवर सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.

जमिनीच्या प्रकारानुसार स्वतंत्र मातीचे नमुने घ्यावेत आणि प्रत्येक प्रकारात अंदाजे २० ठिकाणचा नमुना घ्यावा. मात्र हे क्षेत्र ४ हेक्टरपेक्षा जास्त नसावे.

नमुना ज्या ठिकाणचा घ्यावयाचा आहे, त्या ठिकाणच्या जमिनीवरील काडीकचरा, धसकटे, दगड बाजूला करावीत.

पिकानुसार मातीचा नमुना घेण्यासाठी खड्ड्याची खोली

अ.क्र. पीक खड्ड्याची खोली (सेंमी.)

१. हंगामी पिके २० सेंमी.

२. ऊस, कापूस इ. नगदी पिके ३० सेंमी.

३. फळ पिके १०० सेंमी, वेगवेगळ्या थरातून.

टीप : शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत. सर्वसाधारणपणे नमुना काढणे व प्रयोगशाळेत पाठविणे यामध्ये दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ नसावा, अन्यथा माती पृथक्करण बदलण्याची शक्यता असते.

फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळ्या थरामधून घ्यावा उदा. खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील ३० सेंमीपर्यंत मुरूम नसल्यास ३० ते ६० सेंमी थरातील दुसरा थर व खोल जमिनीत ६० ते ९० सेंमी पर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घेऊन प्रयोगशाळेत पाठवावेत.

जमीन क्षारयुक्त व क्षारयुक्त- चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेंमीमधील क्षार बाजूला करून नंतरच नमुना घ्यावा.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com