Pulses Market : कडधान्यांची यंदा दुप्पट आयात

Pulses Import : भारताने २०२३-२४ या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजेच ४५ लाख टन आयात केली आहे.
Pulses
Pulses Agrowon

New Delhi News : भारताने २०२३-२४ या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजेच ४५ लाख टन आयात केली आहे. याकरिता तब्बल ३१ हजार कोटींवर रुपये मोजावे लागले आहेत. तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महागाई नियंत्रणाच्या नावाखाली कडधान्यांची आयात करून केंद्र सरकार हे शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेतल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

कडदान्य आयात याप्रमाणे... (कंसात आयातीवरील खर्च)

२०२३-२४ : ४५ लाख टन (३१ हजार १८२ कोटी रुपये)

२०२२-२३ : २४.५ लाख टन

केंद्र सरकारने कडधान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले, त्यात हमीभावाने खरेदीची हमी, हमीभावात वाढ केली तरीही देशातील कडधान्य उत्पादनात उत्पादनात २ ते ३ वर्षांपासून कडधान्य उत्पादनात घट झाली आहे. मागच्या हंगामात देशात २६१ लाख टन कडधान्य उत्पादन झाले होते. तर २०२३-२४ च्या हंगामात २३४ लाख टनांवर स्थिरावले.

Pulses
Pulses Market : कडधान्य आयातीत दुपटीहून अधिक वाढ

देशात कडधान्याची मागणी दरवर्षी वाढत आहे. पण दुसरीकडे कडधान्य उत्पादनात गेल्या २ ते ३ वर्षांत घटच होत गेली. देशातील मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने आयातवाढीचा निर्णय घेतला. त्यासाठी ब्राझील आणि अर्जेंटिना यांसारखे नवे निर्यातदार शोधले आहेत. या देशांसोबत दीर्घकालीन आयातीचे करार केले आहेत.

ब्राझीलमधून २० हजार टन उडीद आयातीचे करार पूर्ण झाले. तूर आयातीचा करार जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. भारत सरकारने मोझांबिक, टांझानिया आणि म्यानमार सोबतही करार केला आहे. मागील काही महिन्यांपासून आयातीचा जोर वाढला आहे. अलीकडेच सरकारने शुल्कमुक्त पिवळा वाटाणा आयातीला ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली. सरकारच्या मते फेब्रुवारी महिन्यात कडधान्यांतील महागाई १९ टक्के होती, ती मार्च महिन्यात १७ टक्क्यांवर आली. म्हणजेच कडधान्याचे भाव कमी झाले.

देशातील कडधान्य उत्पादन २०१९-२० च्या हंगामात २३० लाख टन उत्पादन झाले होते. पण सरकारच्या धोरणामुळे २०२०-२१ च्या हंगामात उत्पादन वाढून २५४ लाख टनांवर पोहोचले होते. पण २०२१-२२ मध्ये उत्पादन वाढून २७३ लाख टनांवर पोहोचले होते. मात्र २०२२-२३ मध्ये उत्पादनात २६० लाख टनांपर्यंत कमी झाले होते.

Pulses
Pulses Market : कडधान्यांतील दरवाढ कायम राहण्याची शक्यता

मूग, उडीदही घटला

चालू हंगामात खरीप उत्पादन कमी होऊन ७६ लाख टनांपासून कमी होऊन ७१ लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. तर उडदाचे उत्पादन १७.६८ लाख टनांपासून कमी होऊन १५ लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मूग उत्पादनही कमी होऊनही १७ टनांवरून १४ लाख टनांपर्यंत कमी झाले. देशातील उत्पादन कमी होण्यामागे बदलते वातावरण हे मुख्य कारण आहे.

लागवड क्षेत्रही कमी झाले

देशातील पेरा वाढत असतानाच मागील ३ ते ४ वर्षांपासून लागवड क्षेत्रात पुन्हा घट दिसून आली आहे. २०२१-२२ मध्ये देशातील कडधान्य लागवड ३०७ लाख हेक्टरवर होते. ते २०२३-२४ मध्ये कमी होऊन २५७.८५ लाख हेक्टरपर्यंत आले. मागील दोन वर्षांत कडधान्य लागवड १६ टक्के आणि १४ टक्क्यांनी कमी झाली.

केंद्र सरकारचे धोरणही जबाबदार

देशातील कडधान्य उत्पादन कमी होण्यामागे सरकारचेही धोरण जबाबदार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सरकार उत्पादन वाढल्यानंतर हमीभावाने तूर, मूग, उडीद खरेदी करत नाही. तर उत्पादन कमी होऊन भाव वाढल्यानंतर हमीभावाने शेतकऱ्यांनी विकण्याची अपेक्षा करते.

सरकार देशात उत्पादन वाढल्यानंतर आयात करते आणि भाव पाडते. तसेच चांगला भाव वाढल्यानंतर सरकारने कडधान्यावर स्टॉक लिमिटही लावले, तसेच राज्यांना कडधान्य साठ्यावर बारीक लक्ष ठेवण्यासही सांगितले आहे. सरकारची अशी धोरणेही देशातील कडधान्य उत्पादन घटण्याला जबाबदार ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com