
Buldana News: जगविख्यात सरोवर आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांमुळे ओळखले जाणारे लोणार सरोवर अभयारण्य आता व्यवस्थापनातही देशात अग्रस्थानी पोहोचले आहे. भारतीय वन्यजीव संस्थान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील एकूण ४३८ राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांतून लोणार सरोवर अभयारण्याने दहावा क्रमांक पटकावला आहे.
२००० मध्ये हे अभयारण्य म्हणून घोषित झालेले आहे. ३६५ हेक्टर क्षेत्र असून, उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बळावर देशपातळीवर झळकले आहे. बेसाल्ट खडकांमध्ये निर्माण झालेले जगातले हे एकमेव सरोवर, अशी या परिसराची ओळख आहे.
शेकडो प्रकारच्या पक्ष्यांचे आणि जैवविविधतेचे हे महत्त्वाचे स्थान मानले जाते. पाच वर्षांच्या काळात या अभयारण्याचे व्यवस्थापन, संरक्षक उपाययोजना, पर्यावरणीय संवर्धन आणि स्थानिक सहभाग या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. त्यात ८४ अभयारण्यांची स्थिती ‘उत्तम’ ठरलेली आहे. तर १८ अभयारण्यांना व्यवस्थापनात नकारात्मक शेरा मिळाला.
पर्यटन बळकटीकरण हाच पुढचा टप्पा
लोणार परिसर पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असूनही, अद्याप अपेक्षित सुविधा उभारल्या गेलेल्या नाहीत. काही वर्षांपूर्वी शासनाने पर्यटन आराखडा तयार केला होता, परंतु त्याच्या अंमलबजावणीत गती दिसून आलेली नाही. देश-विदेशातून येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवायची असेल, तर मूलभूत सुविधा, माहिती केंद्र, मार्गदर्शन फलक, स्वच्छता व निवास व्यवस्था विकसित करण्याची गरज आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.