Wildlife Sculptures: भोकणी गावाने वन्यजीव शिल्पांची उभारली अनोखी गॅलरी

Bhokani Village Innovation: सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने जैवविविधता संवर्धनासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. गावात दुर्मीळ वन्यजीव प्रजातींच्या शिल्पांची गॅलरी उभारून पर्यावरण शिक्षण व इको-पर्यटनाचा सुंदर संगम साधण्यात आला आहे.
Wildlife Sculptures
Wildlife SculpturesAgrowon
Published on
Updated on

Nashik News : पर्यावरण संरक्षण व जैवविविधता संवर्धन काळाची गरज आहे. या दिशेने सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत वन्यजीव शिल्पांची एक अनोखी गॅलरी उभारली आहे. या शिल्पांद्वारे दुर्मीळ आणि धोक्यात असलेल्या प्रजातींविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा उपक्रम पर्यटक आणि अभ्यासकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेत नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रमुख वन्यजीव शिल्पे यांचे प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आले आहे. यामध्ये वाघ, महान द्विधारी हॉर्नबिल, गॅलापागोस कासव, टोको टुकान, सारस क्रौंच, फ्लेमिंगो, चित्ता, अजगर यांच्या प्रतिकृती आहेत. या वन्यजीव शिल्पांची निर्मिती सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार माधव फडतरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे गावात शिल्प आहेत; याशिवाय गावच्या प्रवेशद्वारावरही प्राणी, पक्षी यांच्या प्रतिकृती आहेत.

Wildlife Sculptures
Water for Wildlife : वन्यप्राण्यांसाठी पाणवठ्यांची सोय

ग्रामविकासाची योजना

या शिल्पांबरोबर प्रत्येक प्रजातीची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी येथे येऊन पर्यावरण संवर्धनाचे धडे घेत आहेत. भविष्यात अधिक वन्यजीव शिल्पे उभारण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे. तसेच, इको-टूरिझम वाढवून गावच्या आर्थिक विकासास हातभार लावण्याची योजना आहे. माझी वसुंधरा ४.० च्या यशानंतर माझी वसुंधरा ५.० मध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू असून नियमित पर्यावरण संरक्षण मोहीम सुरू आहे.

शिल्प साकारण्याचा उद्देश

प्राणी... उद्देश

वाघ... वाघांच्या घटत्या संख्येवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

महान द्विधारी हॉर्नबिल... हा पक्षी बियांचे प्रसारण करणारा जंगल संरक्षक आहे. त्याचे शिल्प वनस्पतींच्या पुनरुत्पादनातील पक्ष्यांचे महत्त्व समजावते.

Wildlife Sculptures
Wildlife Preservation: साडेचार लाख माकडांना सोडले नैसर्गिक अधिवासात

गॅलापागोस कासव... पृथ्वीवरील सर्वात मोठ्या कासवांपैकी एक. याच्या अस्तित्वावर हवामान बदलांचा होणारा परिणाम दर्शविण्यात आला आहे.

टोको टुकान... हा पक्षी जंगलात बीजारोपणासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या शिल्पातून रंगीबेरंगी जैवविविधतेची जाणीव होते.

सारस क्रौंच... हा पक्षी आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत राहतो. याच्या नष्ट होणाऱ्या अधिवासावर प्रकाश टाकण्यासाठी हे शिल्प उभारले आहे.

फ्लेमिंगो... हा पक्षी मोठ्या थव्यांमध्ये राहून पाणथळ जागांचे आरोग्य टिकवतो. त्याच्या स्थलांतर प्रक्रियेवर या शिल्पातून भाष्य करण्यात आले.

चित्ता... या प्राण्याच्या अस्तित्वावरील संकट दर्शविण्यासाठी हे शिल्प उभारले आहे.

पर्यावरण पूरक गावाची संकल्पना राबवण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ विशेष मेहनत घेत आहोत. हा उपक्रम निसर्गप्रेमींना आणि अभ्यासकांना जैवविविधता समजून घेण्यास मदत करतो. गावाने घेतलेला हा पुढाकार अन्य गावांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. सरकार आणि पर्यावरणसंस्था यांनी देखील या उपक्रमाची दखल घेत आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
अरुण वाघ, सरपंच, भोकणी, ता. सिन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com