Election Process 2024 : सोलापुर जिल्ह्यात १२ एप्रिलपासून लोकसभेची निवडणूक प्रक्रिया

Solapur Loksabha Election : सोलापुर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024Agrowon

Solapur News : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ साठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला असून सोलापूर जिल्ह्यात सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे.

पण निवडणुकीची आधीची प्रक्रिया १२ एप्रिलपासून सुरु होणार आहे, आचारसंहिताही लागू झालेली आहे. तेव्हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

Loksabha Election 2024
America Election Story : अमेरिकेतील निवडणूक खर्चाची रम्य कथा

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी अधिकाऱ्यांसह राजकीय प्रतिनिधींची बैठक घेतली, त्यात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी,

जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह कॉग्रेसचे मनीष गडदे, नंदकुमार पवार, भारतीय जनता पार्टीचे अनिल कंदलगी, शिवसेना ठाकरे गटाचे जरगीस मुल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नरसिंग म्हेत्रे, मोहन कोकूल, राष्ट्रवादी पार्टीचे (अजित पवार) संतोष जाधव, शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे, आम आदमी पार्टीचे खतीब वकील, बसपाचे शीलवंत काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Loksabha Election 2024
Lok Sabha Election 2024 : पुणे जिल्ह्यात ८ हजार ३८२ केंद्रांवर होणार मतदान

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की प्रत्येक नागरिक, राजकीय पक्ष यांनी आदर्श आचारसंहितांचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास आदर्श आचारसंहिता कक्षाच्या वतीने संबंधिता विरोधात तत्काळ आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, याची नोंद घ्यावी, जिल्ह्यात मतदानासाठी एकूण ३ हजार ६१७ मतदान केंद्रे आहेत. तसेच ३ हजार ५९९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण २७ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत, असेही ते म्हणाले.

अशी असेल निवडणूक प्रक्रिया

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी १२ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना जाहीर होईल, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२४ असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२४, मतदानाची तारीख ७ मे २०२४ तर मतमोजणी- ४ जून २०२४ रोजी होईल, असे त्यांनी सांगितले.

तरुण मतदारांची संख्या अधिक

जिल्ह्यात एकूण ११ विधानसभा मतदार संघ आहेत, त्यात एकूण पुरुष मतदार १८ लाख ७६ हजार ४९८, स्त्री मतदार १७ लाख ५० हजार २९७ व इतर मतदार २८० असे एकूण ३६ लाख २७ हजार ७५ एवढे मतदार व ४ हजार ५१९ सैनिक मतदार आहेत. यामध्ये १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास ५२ हजार ७८३ असून २०-२१ वयोगटातील मतदार हे ७ लाख १२ हजार १४७ इतके आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com