Logistic Hub: महाराष्ट्रात लॉजिस्टिक क्रांती! औद्योगिक विकासाला नवी चालना

Maharashtra Industrial Growth: राज्यस्तरीय पाच ‘लॉजेस्टिक्स हब’ औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक हब किमान ५०० एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे-भिवंडी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे-पुरंदर, पालघर-वाढवण आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या ठिकाणांचा समावेश आहे.
Logistic Park
Logistic ParkAgrowon
Published on
Updated on

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

National Logistics Park: भारत सरकारने जाहीर केलेल्या पीएम गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन २०२१ नुसार रेल्वे, महामार्ग, जहाजबांधणी इत्यादीसाठी राज्यस्तरावर कृषी क्षेत्र व उद्योगधंद्यासाठी आवश्यक दळणवळणाच्या प्रगतीच्या दृष्टीने आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शासनामार्फत जिल्हा, विभाग आणि राज्य अशा तीनही स्तरावर दळणवळणाचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्थांनी महाराष्ट्र दळणवळण धोरण २०२४ नुसार या तीनही स्तरांवर व्यवसायाच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन केल्यास विविध प्रकल्पांच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या गोदामांना तसेच गोदाम आधारित मूल्य साखळ्यांच्या माध्यमातून या समुदाय आधारित संस्थांना निश्चित व्यवसाय उपलब्ध होऊ शकेल.

त्यादृष्टीने या संस्थांनी गोदामाशी निगडित व्यवसायाच्या संधी शोधून त्या अनुषंगिक पर्याय समजून घेताना दळणवळण या अत्यंत महत्त्वाच्या घटकाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता या दळणवळणाशी निगडित धोरणाचा अभ्यास करून त्यातील शेतकरी कंपनी आणि सहकारी संस्थांच्या फायद्याच्यादृष्टीने उपयुक्त ठिकाणे आणि पर्यायी व्यवसायांची निवड करून वैज्ञानिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम, शीतगृहे, पॅकहाउस यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करावी.

Logistic Park
Logistic Park : लॉजिस्टिक पार्क ठरत आहे दिवास्वप्न

राष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक पार्क

राज्यस्तरीय मेगा लॉजेस्टिक पार्क बरोबरच राष्ट्रीय स्तरावरील लॉजेस्टिक पार्कची निर्मिती करण्यात येत असून, नागपूर-वर्धा या ठिकाणी राष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक पार्कची निर्मिती प्रगतिपथावर आहे. यासाठी चार राष्ट्रीय महामार्ग नागपूर जिल्ह्याला जोडले जात आहेत.

सुमारे १५०० एकरांवर नागपूर- वर्धा राष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक हबची निर्मिती करण्यात येत असून ही जागा स्थानिक प्रशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राज्य सरकार, मुख्य नियोजन यंत्रणा, स्थानिक यंत्रणा यांच्या सहकार्याने घेण्यात आली आहे. खासगी क्षेत्राला गुंतवणुकीबाबत आवाहन करण्यात आले आहे.

या ठिकाणी कृषी, अभियांत्रिकी यासारख्या सर्व क्षेत्रातील पुरवठा साखळ्यांसाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सेवा सुविधा उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता स्मार्ट दळणवळण संकल्पनेची निर्मिती करण्यात आली असून, त्याचा पुरेपूर वापर या ठिकाणी करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील लॉजेस्टिक पार्कमध्ये सुविधा

एकात्मिक लॉजेस्टिक पार्क.

गोदाम आणि शीतगृह.

सामुदायिक सुविधा केंद्र.

पॅकेजिंग सुविधा.

ट्रक टर्मिनल, बस टर्मिनल, रेल्वे.

कंटेनर फ्रेट स्टेशन. विमानतळ.

मेगा व अल्ट्रा मेगा लॉजेस्टिक पार्कसोबत कनेक्टिविटी

संशोधन केंद्र व प्रयोगशाळा

आंतरराष्ट्रीय विनिमय केंद्र

मिहान प्रकल्पासोबत जोडणी.

उद्योगांना विशेष अनुदान.

उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या उद्योगांना विशेष सवलत.

Logistic Park
Lodgistic Park : वसमतमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार ः पाटील

नवी मुंबई-पुणे आंतरराष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक हब

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईजवळील नवी मुंबई हे शहर उत्पादन आणि सेवा उद्योगामुळे अल्पावधीतच औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनले आहे. नवी मुंबई येथील ‘जेएनपीटी’च्या व्यापक आयात-निर्यातीशी निगडित बहू-स्तरीय घटकांमुळे ते लॉजेस्टिक्स क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

तळोजा, पाताळगंगा, रसायनी, खोपोली, महाड, रोहा, चाकण, तळेगाव या औद्योगिक वसाहतींमुळे नवी मुंबई ते पुणे हा परिसर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उद्योगाचे प्रमुख केंद्र बनला आहे. नवी मुंबईत अनेक मोठे उद्योग कार्यरत असून शहरात उत्कृष्ट वाहतूक सुविधा आहे. राष्ट्रीय महामार्ग १७, मुंबई- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग-४) आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सारख्या प्रमुख महामार्गामुळे नवी मुंबईला दळणवळण अतिशय सोईस्कर आहे. यामुळेच दळणवळणाच्या सोईसाठी या भागाचा आंतरराष्ट्रीय मेगा हबमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या धोरणात नवी मुंबई-पुणे आंतरराष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक्स हब, हे तीन प्रमुख बंदरे आणि नवी मुंबई येथील नियोजित नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचा तळोजा, पाताळगंगा, रसायनी, खोपोली, महाड, रोहा, चाकण व तळेगाव या औद्योगिक क्षेत्रांच्या उपयोगाच्या अनुषंगाने व दळणवळणाच्या दृष्टीने राज्याचे एक महत्त्वाकांक्षी लॉजेस्टिक्स हब विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

या क्षेत्रातील २००० एकर जमिनीवर हा आंतरराष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक्स हब विकसित करण्याचे नियोजन असून, त्याची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेली आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय मेगा लॉजेस्टिक्स हबमुळे पनवेल ते चाकण या मार्गावरील कंपन्यांमधून उत्पादित उत्पादने जसे की ऑटोमोटिव्ह क्षेत्राशी निगडित उत्पादने, शेती व सागरी क्षेत्रातील उत्पादने, लोखंड आणि पोलाद, अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि रसायने इत्यादी वस्तूंची वाहतूक जेएनपीटी, दिघी व वाढवण या बंदरांमधून आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या माध्यमातून सुलभरीत्या करणे शक्य होऊ शकेल. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय मेगा हब अंतर्गत विविध सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.

Logistic Park
Warehousing Policy : राज्याचे गोदाम साठवणूक, दळणवळण धोरण

एकात्मिक आणि बहुआयामी लॉजेस्टिक्स पार्क, मेगा आणि अल्ट्रा मेगा लॉजेस्टिक पार्क

मॉड्यूलर लवचिक गोदामे / शीतगृहे.

सामूहिक सुविधा केंद्रे.

ग्रीन आणि स्मार्ट लॉजेस्टिक्स पार्कसाठी विशेष प्रोत्साहन.

एआय / इंडस्ट्री ४.० आधारित तंत्रज्ञानाच्या वापरासाठी अतिरिक्त प्रोत्साहन.

ट्रक टर्मिनल्स.

जेएनपीए, विमानतळ आणि नवीन विमानतळाशी संपर्क.

संशोधन आणि विकास आणि चाचणी सुविधा.

कौशल्य विकासासाठी भागीदारी.

राज्यस्तरीय ‘लॉजेस्टिक पार्क’चा विकास

दळणवळणाशी निगडित पायाभूत सुविधांमुळे आणि सोईस्कर भौगोलिक स्थानांमुळे, राज्यभरातील दळणवळणाच्या सुविधांची अखंड जोडणी करण्यासाठी जिल्हा आणि विभागीय ‘लॉजेस्टिक्स हब’ व्यतिरिक्त राज्यस्तरीय ‘लॉजेस्टिक्स हब’ची योजना आखण्यात आली आहे. हे राज्यस्तरीय ५ ‘लॉजेस्टिक्स हब’ औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक हब किमान ५०० एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे-भिवंडी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे-पुरंदर, पालघर-वाढवण आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या पाच ठिकाणांचा समावेश आहे.

राज्यातील ‘लॉजेस्टिक हब’

राज्यस्तरीय लॉजेस्टिक हब कृषी आणि संलग्न उत्पादने इतर उत्पादने एमआयडीसी/ पोर्ट/ इतर जिल्हास्तरीय हब प्रस्तावित सुविधा शेजारील राज्यांशी दळणवळण छत्रपती संभाजीनगर-जालना ५०० एकर क्षेत्र रेशीम व कापूस उत्पादन, खते, औषधे, बियाणे, कीटकनाशके अभियांत्रिकी, प्लॅस्टिक, औषधे, वाहने, स्टील, रिफायनरीज, सिमेंट पाइप, इत्यादी. शेंद्रा, चिखलठाणा, वाळुंज, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर एकात्मिक लॉजेस्टिक पार्क, गोदामे, शीतगृह, सामुदायिक सुविधा केंद्र, ट्रक टर्मिनल, संशोधन केंद्र, प्रयोगशाळा,

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशासकीय सहकार्य मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक ठाणे-भिवंडी ५०० एकर क्षेत्र कृषी, अन्न प्रक्रिया उद्योग, मत्स्य प्रक्रिया उद्योग वस्त्रोद्योग, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, आयटी, अभियांत्रिकी, पॅकेजिंग शहापूर, मुरबाड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी एकात्मिक लॉजेस्टिक पार्क, गोदामे, शीतगृह, सामुदायिक सुविधा केंद्र, ट्रक टर्मिनल, विमानतळ, जेएनपिटी, मेगा व अल्ट्रा मेगा लॉजेस्टिक पार्कसोबत जोडणी. गोवा, गुजरात, केरळ, कर्नाटक

रत्नागिरी-सिंधुदुर्ग ५०० एकर क्षेत्र आंबा, काजू सारखी १० प्रकारची फळे, मत्स्योद्योगाशी निगडित प्रक्रियायुक्त उत्पादने, सागरी उत्पादने स्टील, लोखंड जयगड पोर्ट, आंग्रे पोर्ट, नाशिक पोर्ट, वर्धा, जालना, सांगली एकात्मिक लॉजेस्टीक पार्क, गोदामे, शीतगृह, सामुदायिक सुविधा केंद्र, ट्रक टर्मिनल, पॅकेजिंग सुविधा, कंटेनर स्टेशन, विमानतळ, जेएनपीटी, मेगा व अल्ट्रा मेगा लॉजेस्टिक पार्कसोबत जोडणी, संशोधन केंद्र, प्रयोगशाळा, आंतरराष्ट्रीय विनिमय केंद्र. गोवा, गुजरात, केरळ, कर्नाटक पुणे-पुरंदर ५०० एकर क्षेत्र अन्न प्रक्रिया उद्योग,

कृषी प्रक्रिया उद्योग अभियांत्रिकी उत्पादने, वाहनाचे भाग, माहिती तंत्रज्ञान, पॅकेजिंग उद्योग, प्लॅस्टिक, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, सेवा क्षेत्र जेएनपीटी, मुंबई पोर्ट ट्रस्ट, वाढवण पोर्ट, लोहगाव विमानतळ, पुरंदर विमानतळ, ७७५४ एमआयडीसी प्लॉट्‌स, ५ लाख उद्योग मेगा व अल्ट्रा मेगा लॉजेस्टिक पार्कसोबत जोडणी, गोदामे, शीतगृह, ट्रक टर्मिनल, सामुदायिक सुविधा केंद्र, कंटेनर स्टेशन, प्रयोगशाळा, कौशल्य विकास केंद्र गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, चेन्नई, आंध्र प्रदेश

पालघर-वाढवण-५००० एकर क्षेत्र मत्स्योद्योगाशी निगडित प्रक्रियायुक्त उत्पादने, सागरी उत्पादने, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग, डेअरी प्रक्रिया उद्योग इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अभियांत्रिकी उत्पादने गुजरात औद्योगिक क्षेत्र, वाढवण पोर्ट, सागरमाला प्रकल्प, दिल्ली-मुंबई कॉरिडॉर मेगा व अल्ट्रा मेगा लॉजेस्टिक पार्कसोबत जोडणी, गोदामे, शीतगृह, ट्रक टर्मिनल, सामुदायिक सुविधा केंद्र, कंटेनर स्टेशन, प्रयोगशाळा, कौशल्य विकास केंद्र, पोर्ट संबंधित उद्योग गुजरात, कर्नाटक, दिल्ली, गोवा, केरळ

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com