Lodgistic Park : वसमतमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार ः पाटील

Sasmat News : ‘‘वसमत तालुक्यातील भेडेंगाव शिवारातील जुनोना येथे भव्य ड्रायपोर्ट कम ‘लॉजिस्टिक पार्क’ उभारले जाणार आहे. त्याबाबत केंद्रीय रस्ते परिवहन विभाग आणि राजमार्ग मंत्रालयातर्फे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे,’’ अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.
 Logistics Park
Logistics Park Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Vasmat : हिंगोली : ‘‘वसमत तालुक्यातील भेडेंगाव शिवारातील जुनोना येथे भव्य ड्रायपोर्ट कम ‘लॉजिस्टिक पार्क’ उभारले जाणार आहे. त्याबाबत केंद्रीय रस्ते परिवहन विभाग आणि राजमार्ग मंत्रालयातर्फे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे,’’ अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, ‘‘या प्रकल्पामुळे हजारो तरुण कुशल, अर्धकुशल आणि उच्चशिक्षित तरुणाईला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शिवाय, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालास एका जागेवरून दुसऱ्या जागेवर अगदी सहजपणे नेता येईल. त्यांच्या मालास योग्य असा मोबदला देखील मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.’’

 Logistics Park
Logistics Park : ‘निसाका’ वर ड्रायपोर्टऐवजी मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क

‘होलसेल मॉल चेन होणार तयार’
‘‘‘लॉजिस्टिक पार्क’मध्ये फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. मोठ्या कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो. ‘लॉजिस्टिक हब’मध्ये ट्रक टर्मिनल्स, कुलिंग, प्लॅन्ट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन तयार केली जाईल,’’ असे पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com