Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम सरी

Rain News : पावसासाठी पोषक झालेल्या वातावरणामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या.
Pune Rain
Pune RainAgrowon
Published on
Updated on

Pune News : पावसासाठी पोषक झालेल्या वातावरणामुळे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. आंबेगाव, पाटस, वरवंड या तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. तर मंगळवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत घोडेगाव येथे सर्वाधिक ७६.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

झालेल्या पावसामुळे मागील चोवीस तासांमध्ये सर्व धरणे मिळून एकूण २.०५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी काही प्रमाणात वाढली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप दिली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या.

Pune Rain
Kolhapur Rain : पंचगंगा नदी पात्राबाहेर; ५१ बंधारे पाण्याखाली, अतिवृष्टीचा इशारा

आत्तापर्यंत सरासरीच्या १ लाख ९५ हजार ७१० हेक्टरपैकी १ लाख २२ हजार ४२७ म्हणजेच ६३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी आंतरमशागीचे कामेसुरू आहेत. तर पश्चिम भागातील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतही भात रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी रोपे लागवडीयोग्य झाली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होती.

मागील काही दिवस पश्चिम भागात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी चिखलणीच्या कामांना सुरुवात केली आहे.परंतु पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत होते. त्यातच वेळेवर पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सोमवारी दुपारनंतर वातावरणात चांगलाच बदल झाल्याने हवेली, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर, हवेलीतील भोसरी, चिंचवड, कळस, वाघोली, अष्टापूर भागांत हलक्या सरी पडल्या.

मुळशीतील पौड, थेरगाव, भोरमधील आंबवडे, संगमनेर, भोर, मावळमधील तळेगाव वडगाव मावळ, काले, वेल्हा जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, खेडमधील वाडा, राजगुरुनगर, कुडे, पाईट, आळंदी, कन्हेरसर, कडूस येथे चांगलाच शिडकावा झाला.

Pune Rain
Monsoon Rain : संततधारेमुळे सिंधुदुर्गात पूरस्थिती

आंबेगावमधील कळंब, पारगाव, मंचर तुरळक सरी कोसळल्या. शिरूरमधील टाकळी, मलठण, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर, बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव भागांत पावसाने चांगलाच दिलासा दिला. इंदापुरातील लोणी, काटी, दौंडमधील देऊळगाव, राहू मंडलांत हलक्या सरीबरसल्या.

दौंडमध्ये सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस झाला. पुरंदरमधील सासवड मंडलांत सर्वाधिक ४८.५ मिलिमीटर, तर कुंभारवळण ४३.०, राजेवाडी २०.३ मिलिमीटर तर जेजुरी, परिंचे, भिवंडी, वाल्हा भागांत अधूनमधून पाऊस सरी पडल्या. या पावसामुळे पिके काही प्रमाणात तरारली आहेत.

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस (मिलिमीटर)

हवेली ः केशवनगर १४.५, कोथरूड २८.८, खडकवासला १४.५, थेऊर १३.० उरुळीकांचन २६.०, खेड शिवापूर ४३.८, हडपसर ४८.५

मुळशी : घोटावडे १७.५, माले ३३.५, मुठे ३३.५, पिरंगुट २८.८

भोर ः भोलावडे १६.५, नसरापूर २८.३, किकवी १०.३, वेळू ३५.३, निगुडघर ११.०

मावळ : कार्ला २८.०, खडकाळा १३.३, लोणावळा १९.०, शिवणे १२.३

वेल्हा : वेल्हा ४४.३, पानशेत ५५.०, विंझर २२.८, आंबवणे २६.८

जुन्नर : जुन्नर १२.०, राजूर ४१.५, डिंगोरे ४१.५, आपटाळे ४१.५, ओतूर १३.३

खेड : चाकण १०.५, पिंपळगाव १३.८

आंबेगाव : आंबेगाव ७६.०

शिरूर : वडगाव रासाई १३.३, न्हावरा २१.५, तळेगाव ११.५

बारामती : बारामती १५.५, उंडवडी १३.५

इंदापूर : भिगवण १३.०, इंदापूर १४.८, बावडा १०.३, निमगाव २३.८, अंथुर्णी २७.०, सणसर ५४.०

दौंड : पाटस ७२.८, यवत २६.३, कडेगाव ४९.५, वरवंड ७५.०, रावणगाव १३.० बोरी बधक १८.५, खामगाव १५.०, पारगाव २१.५, बोरी पार्धी ३७.०

पुरंदर : सासवड ४८.५, कुंभारवळण ४३.०, राजेवाडी २०.३

(स्त्रोत : कृषी विभाग)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com