Magnet Projects : ‘मॅग्नेट’अंतर्गत राज्यात ११०० कोटींचे प्रकल्प

Projects Funds Update : राज्यात मॅग्नेट प्रकल्पांतर्गत ११०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Baramati News : राज्यात मॅग्नेट प्रकल्पांतर्गत ११०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामुळे डाळिंब, पेरू, द्राक्ष, केळी, आंबा अशा पिकांना चांगली बाजारपेठ मिळणे, शेतीमालाची व्यवस्थितपणे साठवण व्हावी या उद्देशाने जळोची उपबाजार आवारातील अत्याधुनिक सोई-सुविधायुक्त फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

राज्य शासन व आशियायी विकास बॅंक अर्थसाह्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत राज्य कृषी पणन मंडळ (पुणे) यांच्या मार्फत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारातील फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ८) झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

Ajit Pawar
Ajit Pawar : सेवा संस्थांमधील शेतकरी भागमर्यादा ५० हजार करा

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ‘‘मूल्यसाखळी व्यवस्थेमध्ये जवळपास ४० टक्के नुकसान होते, उत्पादन क्षेत्राजवळ शेतीमालाचे संकलन आणि प्रतवारीची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल. भाजीपाल्याचे होणारे नुकसान टाळण्याकरिता शीतसाखळीगृह उत्पादनावर भर देणे आवश्‍यक आहे.’’

प्रास्ताविक पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी केले. ते म्हणाले, ‘‘फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, मूल्यसाखळ्यांमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्यसाखळीतील सहभाग वाढविणे या उद्देशाने मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत पणन मंडळाने बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राची उभारणी केली आहे.

Ajit Pawar
MAGNET Project : ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत ‘एबीडी’ शिष्टमंडळाचा दौरा

या सुविधा केंद्रामध्ये कोल्ड स्टोअरेज, प्रीकूलिंग युनिट, पॅक हाउस, द्राक्ष, केळी व डाळिंबासाठी ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग लाइन, फ्रोझन फ्रूट स्टोअरेज, ब्लास्ट फ्रिजर, सोलर सिस्टीम, फायर फायटिंग व सोलर सिस्टीम, मटेरिअल रिसिविंग व डिसपॅच एरिया, स्वच्छता गृह, कॅन्टीन व निवास व्यवस्था, पॅकिंग मटेरिअल स्टोअरेज, टेस्टिंग लॅब इत्यादी सुविधा शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी व संबंधित घटकांसाठी उपलब्ध आहेत.

बाजार समितीचे सभापती सुनील पवार म्हणाले, की द्राक्ष, केळी, डाळिंब व भाजीपाला उत्पादकांना या सुविधेचा फायदा होईल. कार्यक्रमास बाजार समितीचे सदस्य, मॅग्नेट प्रकल्पाचे संचालक विनायक कोकरे, उपसंचालक डॉ. अमोल यादव व कृषी पणन मंडळाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com