Dam Water Stock : पालघरमधील धरणांमध्ये ५० टक्क्यांहून कमी साठा

Water Level Update : पालघर जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणीपातळी घटत चालली असून ५० टक्क्यांहून कमी साठा आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Palghar News : पालघर जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे धरणांमधील पाणीपातळी घटत चालली असून ५० टक्क्यांहून कमी साठा आहे. त्यामुळे पुढील तीन महिने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागाला आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. शिवाय पाणीसाठा कमी होत राहिला तर पाणीकपातीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Water Stock
Water Level : इगतपुरीत पाणीपातळी खालावली

पालघर जिल्ह्यात धामणी, कवडास, वांद्री ही प्रमुख धरणे असून त्यांची एकूण ३२२.२४८ दलघमी क्षमता आहे. २ एप्रिलपर्यंत तिन्ही धरणांत एकूण १५६.७९२ दलघमी पाणीसाठा होता. धामणी धरणात ४७.६३ टक्के, कवडास धरणात ४४.७८ टक्के, तर वांद्री धरणात ५७.९६ टक्के पाणीसाठा आहे. याव्यतिरिक्त मनोर, माहीम-केळवा, देवखोप, रायतळे, खांड, देवखोप, मोह खुर्द हे बंधारे आहेत.

जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पातील धामणी आणि कवडास धरणातून वसई-विरार महापालिकेसह डहाणू, बोईसर, पालघर परिसर अदाणी औष्णिक वीज प्रकल्प, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि एमआयडीसी यांसारख्या मोठ्या उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. सोबतच जिल्ह्यातील अन्य लहान धरणांवर गावपाड्यांतील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. रब्बी हंगामात सूर्या आणि वांद्री धरण प्रकल्पातून डहाणू, पालघर तालुक्यातील पाच हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीला सिंचनाचे पाणी पुरविले जाते.

Water Stock
Water Stock : रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीसाठा १.६६ दलघमीने घटला

जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद

मागील वर्षी एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पालघर जिल्ह्यात २,६९१.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. चार महिन्यांत सरासरी २३०९.४ मिमी पाऊस पडतो, मात्र २०२३ मध्ये सरासरीपेक्षा अधिक ११६.६ टक्के पाऊस झाला होता. मागील वर्षा मॉन्सूनचे उशिरा आगमन झाल्याने जूनमध्ये फक्त ५५७.२ मिमी पाऊस झाला होता. जुलैमध्ये सर्व कसर भरून काढत तब्बल १,५०१.६ मिमी विक्रमी पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाने धरणांत १०० टक्के साठा झाला होता.

सद्य:स्थितीतील पाण्याची पातळी

धरणाचे नाव पाणीसाठा (दलघमी) टक्केवारी

धामणी १३१.६२८ ४७.६३

कवडास ४.४६० ४४.७८

वांद्री २०.७०४ ५७.६१

मनोर ०.९७९ ३९.४०

माहीम-केळवा १.७३२ ५३.४२

देवखोप १.३७० ४१.७०

रायतळे ०.६४४ ३४.३५

खांड २.४१५ ५३.६७

मोहखुर्द ११.७४० ३६.५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com