Water Scheme : भडगावसाठी १३३ कोटींची पाणीपुरवठा योजना : पाटील

MLA Kishor Patil : शहरासाठी १३३ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, पुढच्या दीड वर्षात शहरवासीयांना रोज शुद्ध पाणी मिळेल, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
MLA Kishor Patil
MLA Kishor PatilAgrowon
Published on
Updated on

Bhadgaon News : शहरासाठी १३३ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, पुढच्या दीड वर्षात शहरवासीयांना रोज शुद्ध पाणी मिळेल, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेत गिरणेवर पक्का बंधारा, जलशुद्धीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. आपण शहरवासीयांना जो शब्द दिला होता, तो पूर्ण करता आल्याचे समाधान असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

भडगाव शहरासाठी मंजूर झालेल्या १३३ कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा शासन निर्णय गुरुवारी (ता. ४) प्रसिद्ध झाला. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. पुढच्या दीड वर्षात योजनेचे काम पूर्णत्वास येऊन शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणी मिळेल.

MLA Kishor Patil
Water Supply Scheme : योजनांच्या वीजबिलात सवलत अथवा माफी द्यावी : थोरात

योजनेत गिरणा नदीवर कच्चा बंधाऱ्याच्या जागी पक्का ‘केटीवेअर’ बांधण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठा करणारे पंप हे ‘सोलर’वर असणार आहेत.

MLA Kishor Patil
Water Supply Scheme : नगरमधील पाणी योजनांच्या निविदा प्रक्रियेत अफरातफर

आता पुढच्या टप्प्यात म्हणजे दीड ते दोन महिन्यात शहरासाठीच १०० कोटी खर्चाची भुयारी गटारी योजनेला मंजुरी मिळवून समांतरपणे ‘ड्रेनेज’चेही काम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर रस्त्याचा ‘डीपीआर’ तयार करून त्यासाठीही निधी आणणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

गिरणेवर पक्का बंधारा, जलशुद्धीकरण प्रकल्पासह पाणीपुरवठा योजना मंजुर करण्याचा शब्द मी शहरवासीयांना दिला होता, तो पूर्ण करून ऋण फेडता आल्याचे मोठे समाधान असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com