Water Shortage : पाझर तलाव, बंधारे पडले कोरडेठाक

Water Scarcity : संगमनेर तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक गावांमधील पाझर तलाव, छोटे- मोठे बंधारे, सिमेंट बंधारे कोरडेठाक पडले आहेत.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Nagar News : संगमनेर तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक गावांमधील पाझर तलाव, छोटे- मोठे बंधारे, सिमेंट बंधारे कोरडेठाक पडले आहेत.त्यातच उन्हाचीही तीव्रता वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

दरवर्षी तालुक्यात चांगला पाऊस होत असतो. त्यामुळे सर्वत्र पाणी पाहावयास मिळत असते. मात्र, यावर्षी सुरवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे खरीप हंगामही वाया गेला होता. मात्र त्यानंतरही म्हणावा तसा पाऊस झाला नाही.

Water Scarcity
Water Scarcity : पाणीटंचाईच्या झळा वाढल्या

ओढे-नालेही वाहिले नाही तर आंबीखालसा येथील गणपीरदरा तलाव, सारोळे पठार, डोळासणे, माहुली या गावांसह आदी गावांमधील तलाव, छोटे-मोठे बंधारे, सिमेंट बंधारे, साखळी बंधारे संपूर्ण कोरडेठाक पडले आहेत. विहिरी, बोअरवेलही शेवटच्या घटका मोजत आहेत. फेब्रुवारीतच दुष्काळाची भयानक अवस्था पाहावयास मिळत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : रेणा प्रकल्पात केवळ १२ टक्केच जलसाठा

दिवसेंदिवस प्रश्न होतोय गंभीर

सध्या संगमनेर पंचायत समितीच्या माध्यमातून काही गावांसह वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मुळा नदीकाठच्या गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नदीपात्रातील बंधारे कोरडेठाक पडले असून नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.

समाधानकारक पाऊस झाला असता तर एवढ्या लवकर पाणी टंचाईच्या झळा बसल्या नसत्या, मात्र यावर्षी पठारभागासह तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com