Renapur News : यंदा तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील बहुतांश गावाची तहान भागवणाऱ्या रेणा मध्यम प्रकल्पात केवळ २५ टक्केच पाणीसाठा झाला होता. सध्या प्रकल्पात १२ टक्के पाणीसाठा आहे. नियोजन केल्यास हे पाणी अडीच महिने पिण्यासाठी पुरेसे ठरू शकते. मे महिन्यात मात्र रेणापूर शहरासह पानगाव, खरोळा या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
भंडारवाडी (ता. रेणापूर) येथील रेणा मध्यम प्रकल्पावर सध्या पानगाव दहा खेडी, रेणापूर पूरक, बिटरगाव-पाचखेडी-भंडारवाडी व पट्टीवडगाव (ता. अंबाजोगाई) सतरा खेडी पाणीपुरवठा योजना आहेत. या गावांची तहान भागविण्यासाठी रेणा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे येथील पाण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
...या गावाचे अधिग्रहणासाठी प्रस्ताव
तालुक्यातील यशवंतवाडी, बावची, सेलू (खुर्द), माकेगाव, तळणी व मुसळेवाडी या गावांत आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे पंचायत समितीकडे अधिग्रहणासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आले. ते मंजुरीसाठी तहसील कार्यालयात पाठवण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातून दिली.
व्हॉल्व्हच्या गळतीमुळे पाणी वाया
रेणा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या विविध योजनांच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्हच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पानगाव दहा खेडी योजनेवरील पाथरवाडी ते मुरढवदरम्यान सध्या व्हॉल्व्हच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाताना दिसत आहे. अशीच गळती कामखेडा ते रेणापूरपर्यंतच्या जलवाहिनीवर होत आहेत. याबाबत मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
रेणापूर मध्यम प्रकल्प सद्यःस्थिती
उपयुक्त पाणीसाठा २.४५२ दशलक्ष घनमीटर
मृत पाणीसाठा १.१३ दशलक्ष घनमीटर
एकूण पाणीसाठा ३.५८१ दशलक्ष घनमीटर
पाण्याची टक्केवारी ११.९२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.