Kurunur Canal
Kurunur CanalAgrowon

Kurunur Canal: ‘कुरनूर’ची कालवा दुरुस्ती युद्धपातळीवर

Irrigation Revamp: कुरनूर (ता. तुळजापूर) मध्यम प्रकल्पाची कालव्याची पाणी वितरण व्यवस्था ५५ वर्षे जुनी आहे. दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणी कालव्याला गळती लागली होती.
Published on

Dharashiv News: मध्यम प्रकल्पाची कालव्याची पाणी वितरण व्यवस्था ५५ वर्षे जुनी आहे. दुरुस्तीअभावी अनेक ठिकाणी कालव्याला गळती लागली होती. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाण्याचे वितरण होत नव्हते. परिणामी साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला त्याचा फटका सहन करावा लागत होता.

वितरण व्यवस्थेत सुधारणा, अस्तरीकरण आणि बांधकाम दुरुस्तीसाठी हिवाळी अधिवेशनात सरकारने २९ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर या निधीतून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दुरुस्तीच्या निधीसाठी पाठपुरावा केला होता. नुकतीच त्यांनी दुरुस्तीच्या कामाचीही पाहणी त्यांनी केली.

Kurunur Canal
Solar Agriculture Irrigation : सौर ऊर्जेवरील सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान ः नितीन गडकरी

या कामामुळे दहा गावांतील तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. कुरनूर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावांना शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी दिले जाते.

दहा गावांतील तीन हजार ६४३ हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र प्रकल्पाची वितरण व्यवस्था ५५ वर्षे जुनी होती. आजवर झालेला वापर, कालव्याची वेळेवर न झालेली दुरुस्ती, अशा अनेक कारणांमुळे पाण्याचा विसर्ग ५० टक्क्यांवर आला होता. कालवा भरावातून, बांधकामातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याला गळती लागली आहे.

Kurunur Canal
Canal Water Protest : पालखेडच्या पाण्यासाठी अर्धनग्न आंदोलन

त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या भागात असलेल्या शेतकऱ्यापर्यंत उपलब्ध असलेले पाणी पोहोचण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. सिंचन आवर्तनाचा कालावधीही वाढल्याने सिंचन क्षेत्रात मोठी घट झाल्याचे निदर्शनास आले होते. अनेक ठिकाणी शेवटच्या टोकाला कालवा बुजविला गेल्याचे स्थानिक शेतकरी बांधवांनी निदर्शनास आणून दिले होते. शेतकऱ्यांनी उपोषण व आंदोलने केली. रब्बी आणि उन्हाळी हंगामात कालवा दुरुस्त नसल्याने पाणी मिळू शकले नाही.

त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, सिंचन क्षेत्रामध्ये झालेली घट दूर होऊन सिंचन क्षेत्र वाढावे, याकरिता वितरण व्यवस्थेच्या अस्तरीकरण आणि त्यावरील बांधकाम दुरुस्तीसाठी महायुती सरकारकडे पाठपुरावा केल्याने निधी मंजूर झाला. कामाची निविदा ७ ऑक्टोबर रोजी निघाली व रखडलेल्या कालवा दुरुस्तीचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या हक्काचे पाणी लवकरच मिळणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

दुरुस्ती कामात टेक्निकल टेक्स्टाइलचा पेपर

कुरनूर प्रकल्पाच्या कालवा देखभाल आणि दुरुस्तीच्या अनुषंगाने पूर्ण लाइनिंग करून घेणे. सिमेंटचे लाइनिंग करण्यात येणार आहे. याचबरोबर इतर जे कॅनाल आहेत त्याचे देखील काम दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. टप्पा क्रमांक एकमध्ये कुरनूर मध्यम प्रकल्पाचा दहा किमी मुख्य कालव्याचे मातीकाम, त्यावरील बांधकामे व अस्तरीकरण करण्यात येत आहे. तसेच वितरिका, शाखा कालवा व लघू वितरिकांचे मातीकाम व त्यावरील बांधकामाचे एकूण २४.४३ किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे.

टप्पा क्रमांक दोनमध्ये एकूण २०.८७ किलोमीटर मुख्य कालव्यावरील वितरिका, शाखा कालवा व लघू वितरिकांचे मातीकाम व त्यावरील बांधकामे करणे नियोजित आहे. या धरणातून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची सोय दोन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. कामात टेक्निकल टेक्स्टाइल पेपरचा वापर होणार असल्याने पुढील काळात गळती होणार नाही. उर्वरित काम पुढच्या वर्षी घेण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com